वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर ता. माळशिरस येथे पुणे-पंढरपूर रोडवर वेळापूर माळशिरस दरम्यान वेळापूर जवळील इंद्रनील मंगल कार्यालयाच्या शेजारी नातेपुते येथील नागनाथ मिटकरी व ऋषिकेश सोनलकर यांचा पुण्यावरून येणाऱ्या चार चाकी गाडीला अपघात शनिवार दि. 07/05/2022 रोजी सकाळी 10 वाजता झालेला आहे.

नातेपुते येथील मोटर सायकलस्वार वेळापूरकडून नातेपुते दिशेने निघाले होते. चार चाकी गाडी पुण्यावरून मंगळवेढा येथे मूळ गावाकडे निघालेले पुजारी दाम्पत्य गाडीत होते. मोटर सायकल आणि चार चाकी गाडी यांचा समोरासमोर अपघात झालेला आहे. चार चाकी गाडीचे पुढच्या चाकाचा एक्सेल झालेला आहे तर मोटरसायकलचे संपूर्ण फायबर तुटलेले आहेत. दोन्ही युवकांना दुखापत झालेली आहे, पुढील उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेलेले आहेत. वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
