नातेपुते येथील सुप्रसिध्द खत विक्रेते मे. पोपटलाल गांधी यांचा खत विक्री परवाना निलंबित…

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोलापूर बाळासाहेब शिंदे यांनी साळसूदपणाचा बुरखा फाडून खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त

नातेपुते ( बारामती झटका )

नातेपुते येथील सुप्रसिद्ध खत विक्रेते मे. पोपटलाल मुलुकचंद गांधी पुणे पंढरपूर रोड नातेपुते, ता. माळशिरस या खत विक्रेत्याचा खत विक्री परवाना LAFD 11100283 वैध मुदत दि. 31/03/2022 हा खत नियंत्रण आदेश 1985 मधील कलम 31 (1)( ए )( 2 ) नुसार दि. 31/5/2022 पर्यंत निलंबित करण्यात आलेला आहे, असा आदेश परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांनी रासायनिक खत विक्री परवानामध्ये आढळून आलेल्या त्रुटी मध्ये 17/5/20/22 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये दिलेला आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोलापूर बाळासाहेब शिंदे यांनी खत परवाना निलंबित केल्यानंतर नातेपुते पंचक्रोशीमध्ये साळसूदपणाचा बुरखा फाडून खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

मे. पोपटलाल मुलुकचंद गांधी, नातेपुते यांच्या खत विक्री दुकानांमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर श्री. बाळासाहेब शिंदे यांच्या पथकाने दुकानाची दोन ते तीन तास कसून चौकशी केलेली होती. पथकामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर श्री. एस. व्ही. तळेकर, माळशिरस तालुका प्रभारी कृषी अधिकारी डी. एस. गायकवाड, माळशिरस पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री. नितीन चव्हाण, नातेपुते मंडल अधिकारी सतीश कचरे व मंडल कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांनी तपासणी केली असता विक्री केंद्रात त्रुटी आढळलेल्या होत्या. त्याची सुनावणी व स्पष्टीकरण दुकान तपासणी अहवालाविषयी बनणे देण्याविषयी नाव घेण्यात आलेली होती त्यामध्ये –
सदर गोडवानामध्ये
1) झुआरी ॲग्रो केमिकल लिमिटेड या कंपनीच्या 10:26:26 बॅग संख्या 177, 12:32:16 बॅग संख्या 12, 18:46:00 बॅग संख्या 3 छपाई केलेल्या न वापरलेल्या रिकाम्या बॅग्ज दिसून आल्या.
2) सदर गोडावूनमध्ये दिपक फर्टीलायझर या कंपनीच्या 24:24:0 बॅग संख्या 26 छपाई केलेल्या न वापरलेल्या रिकाम्या बॅग्ज दिसून आल्या.
3) परवाना नमूद आलेल्या कंपनीशिवाय यारा, वनिता ॲग्रोकेम, गुरुप्रसाद इंडस्ट्रीज, जी.बी. ॲग्रो इंडस्ट्रीज, ग्रीनलांड ॲग्रो सर्विसेस, गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड लि. या कंपनीचे खते विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे खंड 7 व 8 चा भंग होत आहे.
4) रासायनिक खत साठवणुकीसाठी परवान्यात नमूद केलेल्या गोदामाच्या ठिकाणी न करता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळा नंबर 77 व 37 मध्ये साठवणूक केली असल्याने खंड 7 चे उल्लंघन केलेले आहे.

वरील बाबींचा विचार करता खत नियंत्रण आदेश 1985 मधील परवाना अटी व शर्तीचे उल्लंघन केलेले आहे. आपण दिलेल्या लेखी खुलासामध्ये उपरोक्त सर्व मुद्द्याबाबत चूक मान्य केली असून त्यासंदर्भात दिलेले समर्थन असमाधानकारक आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता आपल्या विक्री परवाना निलंबित करण्यात येत आहे, असा आदेश परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर श्री. बाळासाहेब शिंदे यांनी दिलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleछापा काट्यावर असणारी मांडवे ग्रामपंचायत पुन्हा काट्यावर आल्याने पोट निवडणूक चुरशीची होणार.
Next articleसुमारे पंधरा हजारांची लाच घेताना सहाय्यक विद्युत निरीक्षक जेरबंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here