उद्योजक अतुलशेठ बावकर यांना पितृशोक.

नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते येथील सुभाष शंकर बावकर यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि. २ ऑक्टोंबर २०२१ रोजी सायंकाळी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक अतुल शेठ बावकर यांचे ते वडील होते.
नातेपुते पंचक्रोशीमध्ये बावकर परिवार यांनी उद्योग व्यवसायामध्ये नाव कमावलेले आहे. प्रतिकूल परिस्थितीत व्यवसायाला सुरुवात केलेली होती. छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले आहे काही दिवसांपूर्वी सुभाष बावकर यांना शारीरिक व्याधी सुरू झालेली होती. औषध उपचार सुरू होते मात्र, त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर रविवार दि. 3 ऑक्टोंबर २०२१ रोजी सकाळी ८ वा. राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो व बावकर परिवार यांना दुःखातून सावरण्याची ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng