नातेपुते येथे कट्टर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून आरोग्य मंत्री तानाजी सावंत गेलेल्या मार्गाचे शुद्धीकरण केले.

पोलीस प्रशासनाने तालुका उपाध्यक्ष अमोल उराडे व रुपेश लाळगे यांना स्थानबद्ध केले होते. कट्टर शिवसैनिकांचा निषेध व्यक्त करून कडाडून विरोध.

नातेपुते ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यात प्रथमच नातेपुते येथे राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत आले होते. कट्टर शिवसैनिकांकडून दौऱ्याचा निषेध व्यक्त करून कडाडून विरोध करण्यात आला होता. सर्व शिवसैनिकांना पोलीस प्रशासनाने नोटीस बजावल्या होत्या. अमोल उराडे व रुपेश लाळगे या दोन शिवसैनिकांना स्थानबद्ध केले गेले होते, परंतू फुटीर आमदार मंत्री होऊन आलेले तानाजी सावंत यांच्यावर शिवसैनिकात रोष दिसून आला.

सर्व शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून मंत्री तानाजीराव सावंत गेलेल्या मार्गाचे शुद्धिकरण केले. मंत्री तानाजी सावंत यांच्या खाजगी कार्यक्रमात आशा वर्कर्स आणि सरकारी दवाखान्यातील कर्मचारी यांचा गर्दी जमवण्यासाठी वापर केला गेला. या सावंत यांच्या दौऱ्यात ज्या बोर्डचे उदघाटन केले तो बोर्ड रोडवरील किलोमीटर दर्शक बोर्डचा वापर केला गेला आहे. सरकारी कर्मचारी यांचा उपयोग खाजगी कार्यक्रमात केला, याचा शहरात निषेध व्यक्त केला जात होता. या दौऱ्याला शिवसैनिकातून कडाडून विरोध झाला.

या प्रसंगी माळशिरस तालुका शिवसेनेचे उपाध्यक्ष व कट्टर शिवसैनिक अमोल उराडे, रुपेश लाळगे, नगरसेवक नंदकुमार लांडगे, संदीप लांडगे, किसन भगवान वीरकर, नवनाथ राऊत, सोमनाथ काळे, अक्षय कुचेकर, अमित भरते, धनंजय बोराटे, अरुण नायकुले, संतोष कुचेकर, अल्ताफ आतार, आकाश बोडरे, अक्षय मदने, विशाल पिंगळे, पावन उराडे, शिवम उराडे, रिहाल तांबोळी, विनायक कोतमीरे, गणेश पदामान, सनी गवळी, निशांत इंगोले, गणेश मोरे, साजिद आतार, हर्षद खंडागळे, शीतल कोल्हाळे, धनंजय राऊत, मयूर पिसे, दिलीप लाळगे, गोविंद माने, गणेश शिंदे, प्रवीण डफळ, प्रवीण लोणारे, संतोष काटकर, राहुल आगम, वर्धमान वसगडेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleडॉ. मच्छिंद्र गोरड यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक रणजीत मोटे परिवार व मित्र मंडळाच्यावतीने सन्मान संपन्न.
Next articleनातेपुते नगरीमध्ये आरोग्य मंत्री ना. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे जंगी स्वागत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here