माजी आमदार रामहरी रुपनवर, बाबाराजे देशमुख, उत्तमराव जानकर, मामासाहेब पांढरे, सौ उत्कर्षाराणी पलंगे, मधुकर पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, मालोजीराजे देशमुख, बाळासाहेब सरगर, भैय्यासाहेब बंडगर, यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.
नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते तालुका माळशिरस येथे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मंगळवार दिनांक 03/05/ 20 22 रोजी सकाळी 11 वाजता उद्घाटन समारंभ विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, पंचायत समितीचे माजी सदस्य ज्येष्ठ नेते मधुकर पाटील, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, अजय सकट, डॉक्टर एम पी मोरे, डॉक्टर विठ्ठल कवितके, डॉक्टर ए पी वाघमोडे, डॉक्टर भिवा भाळे, डॉ. कांतीलाल वाघमोडे, डॉक्टर योगेश शेळके, डॉक्टर सचिन होळ, डॉक्टर विवेक महामुनी, डॉ. साईनाथ भोसले, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
अक्षय तृतीया रमजान ईद असल्याने मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा देण्यात आल्या त्यामध्ये माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, नातेपुते नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष मालोजीराजे उर्फ बाबासाहेब देशमुख, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, टायगर ग्रुपचे संस्थापक उपाध्यक्ष भैय्यासाहेब बंडगर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नम्रता व्होरा, डॉक्टर माधव लवटे, डॉक्टर सुप्रिया लवटे, डॉक्टर राम ठोंबरे, डॉक्टर अमित काळे, डॉक्टर सविता गांधी, डॉक्टर रोहित माने देशमुख, डॉ. उदय जाधव , डॉ. अक्षय माने देशमुख, डॉ. नितीन पवार,आदींनी भेटी दिल्या आलेल्या सर्व मान्यवरांचे श्री पोपट नामदेव करे श्री सर्जेराव पोपट करे श्री अण्णा पोपट करे डॉक्टर महेश पोपट करे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

पळसमंडळ तालुका माळशिरस येथील सौ. शोभा व श्री पोपट नामदेव करे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शेतीमध्ये काबाड कष्ट करून आपल्या मुलांना शिक्षण दिलेले आहे. मुलांनी आपल्या परिस्थितीची जाणीव व भान ठेवून आपल्या आई वडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज केलेले आहे करे दांपत्याचे यांना सर्जेराव अण्णा महेश अशी तीन मुले आहेत ब्रह्मा-विष्णू-महेश याप्रमाणे तिघांनीही परिस्थितीवर मात करीत शिक्षण पूर्ण केलेले आहे. सर्जेराव यांनी डी एम एल टी कोर्स पूर्ण केला. अण्णा यांनी पुणे येथे कंपनी मध्ये जॉब मिळवलेला आहे. महेश यांनी बी ए एम एस पूर्ण करून डी सी एच आणि एफ आय सी एच दोन डिग्री पूर्ण केलेल्या आहेत सुरुवातीस भाडोत्री जागेमध्ये हॉस्पिटलची सुरुवात केलेली होती आज स्वतःच्या सुसज्ज जागेमध्ये तीन मजली इमारत उभी करून अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न केलेला आहे.

महेश करे यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरोची तालुका इंदापूर येथे झालेले आहे पाचवी ते आठवी सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे झालेले आहे आठवी ते दहावी शहाजी विद्यालय सुपा येथे झालेले आहे अकरावी ते बारावी मुकटराव शहाजीराव काकडे विद्यालय सोमेश्वर येथे झालेले आहे. बी ए एम एस कैलास वासी केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय गडहिंग्लज कोल्हापूर येथे 16 डिसेंबर 2016 साली पूर्ण केलेले आहे. महेश यांनी डिग्री पूर्ण केल्या नंतर अकलूज येथे डॉक्टर हरि झंजे यांच्याकडे अनुभव घेण्यास सुरुवात केली. बी ए एम एस पूर्ण करून थांबलेले नाहीत. त्यांनी डी सी एच भारत विकास संस्था पुणे येथे पूर्ण केले त्यानंतर नातेपुते येथे 2017 साली स्वतःचे हॉस्पिटल सुरू केले आणि त्याच वर्षी नर्सिंग कोर्स व डी फार्मसी पूर्ण केलेल्या निकिता अधिक रुपनवर यांच्याशी विवाह केलेला होता. महेश व निकिता यांनी रुग्णांची सेवा इमाने-इतबारे करून परिसरात वैद्यकीय क्षेत्रात नाव कमविले होते. महेश यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू असताना शिक्षण सुरूच होते त्यांनी एफ आय सी एच डिग्री 20 20 सालात कंप्लेट केलेली आहे दिवसेंदिवस दवाखान्यामध्ये बाल रुग्णांची संख्या वाढत गेली भाडोत्री जागा अपुरी असल्याने करे परिवार यांनी नातेपुते येथे भाडोत्री जागा घेऊन सुसज्ज असे तीन मजली करे हॉस्पिटल बाल रुग्णालयाची उभारणी केलेली आहे. मातोश्री सौ शोभा पिताश्री श्री पोपट बंधू सर्जेराव व अण्णा धर्मपत्नी सौ. निकिता यांच्यासह मित्रपरिवार नातेवाईक व मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात हॉस्पिटलचा शुभारंभ केलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng