नातेपुते येथे ‘करे हॉस्पिटल बाल रुग्णालय’ चा भव्य उद्घाटन सोहळा

विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते ता. माळशिरस येथे ‘करे हॉस्पिटल बाल रुग्णालय’ या हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवार दि. ३/५/२०२२ रोजी सकाळी १० वा. २५ मिनिटांनी अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर पुणे-पंढरपूर रोड, नंदिनी हॉस्पिटल शेजारी, नातेपुते येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
हा उद्घाटन सोहळा माजी आमदार रामहरी रुपनवर, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते, उत्तमराव जानकर चेअरमन, चां.सा.का., बाबाराजे देशमुख मा.उ.जि.प. सोलापूर, मधुकर पाटील मा. पं. स. सदस्य आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत तर बालरोगतज्ञ डॉ. हरि झंजे, बालरोगतज्ञ डॉ. अंजली फडे, बालरोगतज्ञ डॉ. मनिष राणे, बालरोगतज्ञ डॉ. गणेश श्रीरामे, नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, अहिल्यादेवी संस्थेचे चेअरमन रघुनाथ कवितके, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मामासाहेब पांढरे, नगरसेवक अतूल पाटील, टायगर ग्रुपचे संस्थापक उपाध्यक्ष भैय्यासाहेब बंडगर, काटी ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंत आबा पाटील, नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. पी. मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नम्रता व्होरा, स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत गांधी, बालरोगतज्ञ डॉ. दत्तात्रय निटवे, भूलतज्ञ डॉ. शिरीष चौधरी, जनरल फिजिशियन डॉ. विठ्ठल कवितके, जनरल फिजिशियन डॉ. ए. पि. वाघमोडे, मेडिसिन डॉ. माधव लवटे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. भिवा भाळे, स्त्री रोग तज्ञ डॉ. राम ठोंबरे, नेत्ररोग तज्ञ डॉ. जयपाल चोपडे, बालरोग तज्ञ डॉ. प्रताप मोटे, स्त्री रोग तज्ञ डॉ. सुप्रिया लवटे, जनरल फिजिशियन डॉ. सचिन होळ, जनरल फिजिशियन डॉ. कांतीलाल वाघमोडे, जनरल फिजिशियन डॉ. विवेक महामुनी, स्त्रीरोग तज्ञ डॉ. अमित काळे, जनरल सर्जन डॉ. साईनाथ भोसले, नेत्ररोग तज्ञ योगेश शेळके आदी मान्यवर डॉक्टरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी या वैद्यकीय सेवेचा आणि सोहळा समारंभ कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पोपट नामदेव करे, सर्जेराव पोपट करे, आण्णा पोपट करे आणि बालरोगतज्ञ डॉ. महेश पोपट करे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूज विकास सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण आसबे तर व्हा. चेअरमनपदी योगेश देशमुख यांची बिनविरोध निवड.
Next articleशेतकऱ्यांचा भोंगा कधी वाजणार..? – रणजित बागल, राज्य प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा आघाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here