नातेपुते येथे प्रसिध्द हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या प्रमुख उपस्थितीत डाळिंब, द्राक्ष, केळी व्यवस्थापन चर्चा सत्राचे आयोजन

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते ता. माळशिरस येथे परभणीचे प्रसिध्द हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या प्रमुख उपस्थितीत हवामान बदल व डाळिंब, द्राक्ष, केळी व्यवस्थापन विषयी भव्य चर्चासत्राचे आयोजन सोमवार दि. २३/०१/२०२३ रोजी दु. ३ वा. राज वैभव सांस्कृतिक भवन, नातेपुते येथे करण्यात आले आहे.

सदर चर्चासत्रात बदलत्या वातावरणात निर्यातक्षम आणि गुणवत्तापूर्ण भरघोस डाळिंब, द्राक्ष आणि केळी उत्पन्न शाश्वत पद्धतीने कसे वाढवावे, याविषयी प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे मार्गदर्शन करणार आहेत. सदरचे चर्चासत्र प्रसिद्ध हवामान अभ्यासक परभणीचे पंजाबराव डख, फार्मसन्स ॲग्री सोल्युशन प्रा. लि. चे एमडी जयेश शेवाळे, फार्मसन्स ॲग्री सोल्युशन प्रा. लि. चे एरिया सेल्स मॅनेजर पंढरीनाथ औटी, फार्मसन्स ॲग्री सोल्युशन प्रा. लि. चे ॲग्रो नॉमिस्ट एजाज आतार यांच्या मार्गदर्शनाखाली या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत अजित बोरकर अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, बाबासाहेब माने पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी युवक तालुका, किशोरभैय्या सुळ माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस, के. के. पाटील जिल्हा नियोजन समिती सोलापूर, सोमनाथ अण्णा वाघमोडे अध्यक्ष खंडकरी शेतकरी संघटना, निनाद पाटील निमगाव (म.) पुण्यनगरी पत्रकार प्रगतशील शेतकरी, दादा शिंदे कोंडबावी, साहिल आतार ग्रामपंचायत सदस्य, राजेंद्र कवडे देशमुख पत्रकार, शिवराज पुकळे प्रगतशील शेतकरी, सतीश कुलाल प्रगतशील शेतकरी, सोमनाथ पिसे प्रगतशील शेतकरी, संदीप रणदिवे जनसत्ता पत्रकार, मकरंद साठे पत्रकार, श्रीनिवास कदम पाटील बारामती झटका पत्रकार हे असणार आहे.

या चर्चासत्राचे आयोजन भीमराव जगन्नाथ शेंडगे माळशिरस, विजय अरुण बरडकर नातेपुते, विवेक पांडुरंग काळे पिलीव, सौ. वनिता अण्णा खरात खुडूस, दत्तात्रय जबुवंत मिसाळ लवंग, तुकाराम धनाजी पराडे संगम, प्रसाद ज्ञानदेव खरात अकलूज, राजेंद्र बरडकर नातेपुते (डाळिंब सल्लागार), तानाजी शिंदे खुडूस (द्राक्ष सल्लागार) यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे.

तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून या चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleExactly what is a Data Room Center?
Next articleमाढा येथे होणाऱ्या नेत्र शस्त्रक्रिया शिबिरासाठी सुनेत्रा अजित पवार यांना आमंत्रण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here