नातेपुते येथे राष्ट्रनायक महादेवजी जानकर यांच्याहस्ते राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग नंबर २ मधून सौ. सीमा श्रीकांत बाविस्कर ज्या टेबलचे चिन्ह घेऊन निवडणूक लढत आहेत व प्रभाग नंबर ४ चे अधिकृत उमेदवार दिपाली मधुकर सातपुते या कपबशी या चिन्ह घेऊन लढत आहे. प्रभाग नंबर १३ मधून कोमल सुनील साळवे या टेबल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. प्रभाग नंबर १७ मधून रफिया हनीफ आतार या टेबल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. नगरपंचायत निवडणूकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांच्या शुभहस्ते प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

नातेपुते नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्व उमेदवारासमवेत महादेवजी जानकर साहेब यांनी नातेपुते येथील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून टेकडीवरील गणपती मंदिरात जाऊन आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.
यानंतर त्यांनी पालखी मैदानावरील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन तसेच जानकर वस्ती खडक माळ येथे मतदारांच्या गाठीभेटी घेऊन पदयात्रा काढली. यानंतर महादेवजी जानकर साहेब यांनी पिरळे रोड येथील काळे मळ्यामध्ये जाऊन वस्तीवरील प्रत्येक घरात जाऊन मतदाराच्या गाठीभेटी घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले.

या निवडणूक प्रचार फेरी मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री महादेवराव जानकर साहेब, रामदास शेलार सर, आण्णासाहेब रुपनवर, माऊली सरगर, नितीनदादा धायगुडे, अजित पाटील, शाहिद मुलाणी, रणजीत सुळ, माऊली सरक, रियाज आतार, संजय वलेकर सर, अमरजीत जानकर, बिपिन सातपुते, सनी बाविस्कर, विशाल सोरटे, नामदेव टकले, शंकर शेंडगे, बर्वे, मेटकरी, बापू जानकर, सागर मदने व बहुसंख्य राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते सामील झाले होते‌‌.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यातील नातेपुते, माळशिरस आणि महाळूंग नगरपंचायतीच्या निवडणुका पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडणार.
Next articleसमाज मनावर राज्य करणारे व्यक्तीमत्व – शामराव बंडगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here