नातेपुते विकास सेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमन पदी अजेश पांढरे तर व्हाईस चेअरमन पदी सोमनाथ बंडगर यांची निवड करण्यात आली.

संस्थेचे कार्यकुशल चेअरमन, समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली.

नातेपुते ( बारामती झटका )

नातेपुते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित नातेपुते या संस्थेची स्थापना २०/१०/१९६० साली झालेली आहे. संस्थेस ६२ वर्ष पूर्ण झालेले आहेत. गेल्या ३५ वर्षापासून संस्थेच्या चेअरमन पदाची धुरा समाजरत्न राजेंद्र हनुमंतराव पाटील उर्फ भाऊ यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये पारदर्शक कारभार व सक्षमपणे संस्था प्रतिकूल परिस्थितीत “ड” वर्गात असणारी संस्था “अ” वर्गात आणलेली आहे. संस्थेने कायम सभासदांचे हित जोपासलेले आहे. दरवर्षी सभासदांना लाभांश वाटला जातो. संस्थेची स्वतःची भव्य अशी इमारत आहे. प्रतिकूल परिस्थितीत संस्थेत सहकार्य करणारे अनेक निष्ठावान सहकारी होते. त्यापैकी श्री. मधुकर बापू पांढरे यांचे चिरंजीव श्री. अजेश मधुकर पांढरे यांची चेअरमन पदी तर व्हाईस चेअरमन पदी विश्वासू सहकारी स्वर्गीय भीमराव बाबा बंडगर यांचे पुतणे श्री. सोमनाथ तुकाराम बंडगर यांच्या बिनविरोध निवडी समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आहेत.

नातेपुते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित नातेपुते या संस्थेच्या सन २०२०-२१ ते २०२६-२७ या कालावधीसाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड एल. एम. शिंदे तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटात पाटील अतुल राजेंद्र, पांढरे अजेश मधुकर, काळे बाळासो भिमराव, पांढरे माणिक शिवाजी, बंडगर सोमनाथ तुकाराम, पांढरे रामदास बाबू उर्फ बलराम, पांढरे बळवंत गणपत, पाटील ज्ञानराज संजय असे सदस्य आहेत. अनुसूचित जाती जमाती गटात मिसाळ अशोक बाबुराव, महिला प्रतिनिधी गटात राऊत नागरबाई तानाजी, पांढरे बायडाबाई बापू अशा दोन महिला सदस्य आहेत.

इतर मागास प्रवर्ग गटात बोराटे बाळासो परशुराम, भटक्या जमाती विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटात ठोंबरे दत्तात्रय पंढरीनाथ असे तेरा संचालक बिनविरोध झालेले होते.
सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी एस.व्ही. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन संचालकांची बैठक संपन्न झाली. समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली चेअरमन पदासाठी अजेश मधुकर पांढरे व व्हाईस चेअरमन पदासाठी सोमनाथ तुकाराम बंडगर यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी जाहीर केल्या.

यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील, धुळदेव पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संजयतात्या पाटील, समाजरत्न भाऊंचे विश्वासू सहकारी व माजी व्हाईस चेअरमन शिवाजी निवृत्ती अर्जुन, माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तमआण्णा बरडकर, ॲड. ए. पी. वाघमोडे, नगरसेवक बाळासाहेब काळे, नगरसेवक रणजीत पांढरे, उद्योजक संतोषआबा वाघमोडे पाटील, बाळासाहेब पांढरे, संजय बंडगर, विशाल पांढरे, रामचंद्र पांढरे, धनंजय राऊत, बंटी भोंडवे, जब्बार मुलाणी आदी मान्यवरांसह संस्थेचे सचिव बापूराव पाटील, अमोल गोडसे उपस्थित होते. संस्थेचे मार्गदर्शक राजेंद्र भाऊ पाटील यांनी नुतन चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ व उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

समाज भूषण राजेंद्रभाऊ पाटील यांच्याकडे चेअरमन पदाची धुरा आल्यानंतर कायम सभासदांचे हित जोपासले. संस्थेमध्ये कधीही राजकारण केलेले नाही. पूर्वीच्या काळी बँका, पतसंस्था, अल्पभूधारक व सर्व सामान्य शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा कमी प्रमाणात केला जात होता‌‌. अशा अडचणीच्या काळात राजेंद्रभाऊ पाटील यांनी सभासदांना कधीही कर्जरोख्यांची अडचण येऊ दिली नाही. स्वच्छ व पारदर्शक कारभार करून संस्था नफ्यात आहे. संस्थेची स्वतःची इमारत आहे. बिनविरोध संचालकांमध्ये स्वतःचा मुलगा अतुलबापू व भावाचा मुलगा माउली असतानासुद्धा राजेंद्र भाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीत साथ देणारे सहकारी मधुकर बापू पांढरे यांचे चिरंजीव चेअरमन व स्वर्गीय भीमराव बाबा बंडगर यांचे पुतणे व्हाईस चेअरमन करून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुका भाजपच्या वतीने तालुका अध्यक्ष दादासाहेब खरात व पत्रकार स्वप्निल कुमार राऊत यांचा सन्मान संपन्न झाला.
Next articleगुरसाळे सेवा सोसायटीवर भाजपचे गुलाब गायकवाड चेअरमन, तर राष्ट्रवादीचे दीपक कोरटकर यांची व्हाईस चेअरमन पदी निवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here