Uncategorizedताज्या बातम्या

नातेपुते शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणे काढलेली असल्याने व्यापारी व स्थानिक नागरिक यांनी घेतला मोकळा श्वास.

नातेपुते शहरातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबविली असल्याने भाविकांची अडचण दूर होऊन स्थानिकांची डोकेदुखी कमी झाली.

नातेपुते ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. ४ जुलै २०२२ रोजी येत असून पहिला नातेपुते येथे मुक्काम असतो. दरम्यान, नातेपुते येथील अतिक्रमणे काढण्याची मोहीम नातेपुते नगरपंचायत, नातेपुते पोलीस स्टेशन, पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेली होती. सदर मोहिमेमध्ये नातेपुते शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणे काढलेली असल्याने गाळेधारक, व्यापारी व स्थानिक नागरिक यांनी मोकळा श्वास घेतलेला असून प्रशासनाच्या कारवाईवर व्यापारी, स्थानिक नागरिक समाधानी आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशाने आषाढी यात्रा २०२२ च्या अनुषंगाने नातेपुते शहरातील अतिक्रमणे १५ जूनपर्यंत काढण्याचे कळविण्यात आले होते. अतिक्रमणे काढून घ्यावीत, याबाबत नातेपुते नगरपंचायत व नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने वारंवार जाहीर करण्यात येत होते. वारंवार सूचना देऊन देखील अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे काढली नसल्यामुळे नातेपुते नगरपंचायत, नातेपुते पोलीस स्टेशन व पाटबंधारे विभागाच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबविण्यात आलेली होती.

सदरील अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेत नगरपंचायत मुख्याधिकारी माधव खांडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पाटबंधारे उपअभियंता माळशिरस अमोल मस्कर, पोलीस सब इन्स्पेक्टर ज्योती बैनवाड, पोलीस हवालदार सुरेश राऊत, पोलीस नाईक मसाजी थोरात, नवनाथ माने, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कापसे, अमोल देशमुख, पाटबंधारे प्रशासनाचे मोतीराम गायकवाड, नगरपंचायत प्रशासनाचे अशोक जावरे, पांडुरंग पैठणकर, प्रदीप वनसाळे, चैतन्य पागे, जय क्षिरसागर, संदीप काळे, विकास पांढरे, प्रशांत राऊत आदींसह अन्य मदतनीस कर्मचारी सहभागी झाले होते.

बेकायदेशीर अतिक्रमणे पाठवली असल्याने कायदेशीर असणाऱ्या गाळेधारक व स्वमालकीच्या व्यापारी व स्थानिक नागरिक यांची कायमची डोकेदुखी संपलेली आहे. कितीतरी व्यापारांनी उद्योग व्यवसाय करण्याकरता लाखो रुपये गाळ्यासाठी डिपॉझिट देऊन उद्योग व्यवसाय सुरू केलेला होता. काही लोकांनी गाळ्याच्या समोर ग्रामीण उपरुग्णालय व महाविद्यालय रस्त्याच्या कडेलाच अतिक्रमणे केलेली होती. त्यामुळे उपचारासाठी ने आण करणारी रुग्णवाहने, शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची रस्त्यावर जाण्या येण्याची अडचण, अशा सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत. पुणे पंढरपूर रोड अतिक्रमण हटाव झालेला असल्याने रोड मोठा दिसत आहे. भाविकांना व त्यांच्या वाहनांना कसलीच अडचण होणार नाही‌. स्थानिक व्यापारी व गाळेधारक यांना सुद्धा मनमोकळेपणाने व्यवसाय करता येईल.

नातेपुते नगरपंचायत झालेली असल्याने यापुढे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. पूर्वीच्या काळी ग्रामपंचायत असल्याने अतिक्रमण करणाऱ्या लोकांना संधी मिळत होती. नगरपंचायतीमुळे कायमचे अतिक्रमण हटावे, अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort