जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशीलभाऊ देशमुख व तालुका कार्याध्यक्ष राजाभाऊ हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते शहर राष्ट्रवादीमय करणार – शहराध्यक्ष शमसुद्दीन दादाभाई मुलाणी.
नातेपुते ( बारामती झटका )
देशाचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतरावजी पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे व विचार सर्वसामान्य तळागाळातील जनतेपर्यंत पोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशीलभाऊ देशमुख व माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राजाभाऊ हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराघरात वाढवून जनतेच्या मनामनात विचार पोहोचविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नातेपुते शहराध्यक्ष शमसुद्दिन दादाभाई मुलाणी यांनी बारामती झटकाशी औपचारिक चर्चा करीत असताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाचा झेंडा मुलाणी यांनी खांद्यावर घेतलेला आहे. सर्व जाती-धर्मांमध्ये सलोख्याचे संबंध असून जनतेच्या अडीअडचणीसाठी कायम उपयोगी असतात. नातेपुते शहरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी व पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शमसुद्दिन मुलाणी यांच्याकडे नातेपुते शहर अध्यक्षपदाची जबाबदारी जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील भाऊ देशमुख व तालुका कार्याध्यक्ष राजाभाऊ हिवरकर यांनी दिली.

सदरच्या कार्यक्रमास जिल्हा संघटक हनुमंतराव साळुंके, ज्येष्ठ नेते निजामभाई काझी, फोंडशिरसचे सरपंच पोपटराव बोराटे, ज्येष्ठ नेते विष्णुपंत गोरे, नातेपुते ग्रामपंचायतीचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र कवितके, युवा नेते वैभव कवितके, ओबीसीचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पिसे, विशाल बोराटे, नौशाद आतार, राजेंद्र जठार, सुशांत पाटील, दादाभाई मुलाणी, जब्बार मुलाणी, राहुल जठार, मुक्तार काझी, राजू मुलाणी आदी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये शहराध्यक्ष पदाची निवड केलेली होती.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng