नाथासाहेब शेगर यांनी प्रतिकूल परस्थितीत समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केले. – ह.भ.प.प्रा. प्रसाद महाराज माटे चऱ्होलीकर.

माजी आमदार रामहरी रुपनवर माजी आमदार धनाजी साठे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील, ॲड. एम.एम.मगर सोपानकाका नारनवर, बाळासाहेब लवटे , तुळशीराम तुपे,युवराज झंजे, प्रताप झंजे, सचिन लवटे आदी मान्यवर उपस्थित.


मेडद ( बारामती झटका )

भटक्या विमुक्त नाथपंथी डवरी गोसावी सर्वसामान्य परिवारामध्ये जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या कालावधीमध्ये भरीव कार्य करून समाजामध्ये आपले वेगळे स्थान सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक नाथा साहेब शेगर यांनी निर्माण केले असल्याचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या किर्तन रुपी सेवेमध्ये ह भ प प्रसाद महाराज माटे चऱ्होलीकर यांनी कीर्तनामध्ये सांगितले.


सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक स्वर्गीय नाथासाहेब गणपत शेगर यांचे प्रथम पुण्यस्मरण 19/ 10/ 20 21 रोजी मेडद येथील त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाले या वेळी ह.भ.प. प्रसाद महाराज माटे चऱ्होलीकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार रामहरी रुपनवर, माढ्याचे माजी आमदार धनाजी साठे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील, आपला युवक शेतकरी फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड. एम एम मगर, सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे, शेतकी अधिकारी भोसले साहेब, सेवानिवृत्त डीवायएसपी गायकवाड, मुंबईचे सिव्हिल इंजिनिअर सुनील साळुंखे, पंढरपूरचे आर्किटेक इंजिनिअर आर बी जाधव, ठाणे शहर अभियंता महादेव शिंदे ,मेडद चे माजी सरपंच मार्गदर्शक तुळशीराम तुपे ,विद्यमान सरपंच युवराज झंजे, युवा नेते प्रताप झंजे, माजी सरपंच सचिन उर्फ धुळा लवटे, पत्नी श्रीमती विमल नाथासाहेब शेगर चिरंजीव ज्ञानेश्वर उर्फ नितीन शेगर, कन्या सौ जयश्री अर्जुन इंगोले, मेडदचे ग्रामपंचायत सदस्य महादेवराव काळे, सौ ज्योत्स्ना योगीराज जाधव, सौ वंदना तानाजी चौगुले, सौ अश्विनी सदाशिव शिंदे, सौ रेखा सुदर्शन पलांडे, सौ शुभांगी शरद शिंदे आदींसह मित्र परिवार नातेवाईक ग्रामस्थ उपस्थित होते.


ह.भ.प. प्रसाद महाराज माटे यांना गायनाचार्य ह भ प परमेश्वर महाराज वरकड आळंदी, ह भ प बंडूपंत महाराज खामकर आळंदी, मृदुंगाचार्य ह भ प रवी महाराज चव्हाण आळंदी यांची मोलाची साथ मिळाली मेडद ,उंबरे ,मरकडवाडी, वाठार निंबाळकर येथील भजनी मंडळ यांनी सहकार्य केले.


नाथासाहेब शेगर यांची नात कु. आर्या शरद शिंदे हिने अतिशय सुंदर आजोबांवर गीत गायलेले होते ” सांगा सुखाचा सोहळा कोणी पाहिला, काळ आला जीव गेला देह राहिला ” हे गीत गात असताना उपस्थित सर्व लोकांच्या पापण्यांच्या कडा ओल्या झालेल्या होत्या. दोन तास किर्तन रुपी सेवेमध्ये ह भ प प्रसाद महाराज माटे यांनी अनेक विषयांचा परामर्श घेतला. बारा वाजता कीर्तनाची सेवा समर्थ करून प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली आलेल्या सर्व लोकांचे स्वागत व आभार शरद शिंदे यांनी मानले. सर्व नातेवाईक मित्रपरिवार ग्रामस्थ यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleलवंग येथे युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.
Next articleधैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते तरंगफळ येथे सोलार कृषी पंपाचे उद्घाटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here