नादुरुस्त पावर ट्रांसफार्मर काढून त्या ठिकाणी नवीन ट्रांसफार्मर बसवण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

पंढरपूर (बारामती झटका)

मोहोळ पंढरपुर मतदारसंघाचे आमदार यशवंततात्या माने यांची भेट घेऊन आज चळे सब स्टेशन येतील पावर ट्रांसफार्मर वारंवार नादुरुस्त होत आहे. त्यामुळे चळे, आंबे, सरकोली, ओझेवाडी, नेपतगाव, रांजणी इत्यादी गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे जनतेला लाईट बिल भरून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ऑनलाईन क्लासेस चालू आहेत. परंतु, वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. वाडी-वस्तीवर शेतकरी तसेच गावातील पाणीपुरवठा प्रभावित होत आहे, याची दखल घेऊन तातडीने येथील पावर ट्रांसफार्मर काढून त्या ठिकाणी नवीन ट्रांसफार्मर बसवण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर चळे येथे मुख्य चौकात एक ट्रान्सफॉर्मर आहे, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ट्रान्सफर दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली.

यानंतर आमदार यशवंततात्या माने यांनी तातडीने दखल घेऊन महावितरणचे कार्यकारी अभियंता गवळी साहेब यांना फोनवरून संपर्क करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन शिंदे पाटील, शहाजहान शेख, ग्रा.सदस्य रामदास गाडगे, प्रताप गायकवाड, सचिन आटकळे, बबलू आसबे इत्यादी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरयत मार्फत ४ ऑक्टोबर रोजी ‘संस्था वर्धापन दिन’ समारंभाचे आयोजन
Next articleअशोक खुडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here