नाद करायचा नाय… आमदार केसरी बैलगाडी शर्यतीचा, बैलगाडी स्पर्धेला येताना वाहनात, बैलगाडीत जाताना बक्षिसाच्या मोटरसायकलीवरच….

आमदार केसरी बैलगाडी शर्यतीचे उद्योजक समाजरत्न दत्तात्रय शेळके व मित्र परिवार यांचेकडून आयोजन…

गुरसाळे ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. १९/३/२०२३ रोजी सकाळी ९ वा. मौजे गुरसाळे, ता. माळशिरस येथे आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य समाजरत्न उद्योजक दत्तात्रेय शेळके साहेब व मित्रपरिवार यांच्यावतीने जंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलेले आहे. बैलगाडी शर्यतीचा नाद करायचा नाय, आमदार केसरी बैलगाडी शर्यतीसाठी येताना बैलगाडीत, वाहनात यायचं आणि जाताना बक्षिसाच्या मोटरसायकलवर जायचं… भव्य आणि दिव्य नियोजन संयोजन मंडळाने केलेले आहे.

आमदार केसरी बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक होंडा शाइन मोटरसायकल व चषक द्वितीय क्रमांक होंडा लिवो मोटर सायकल व चषक, तृतीय क्रमांक होंडा एक्टिवा व चषक, चतुर्थ क्रमांक रोख रक्कम ३१ हजार रुपये, पाचवा क्रमांक रोख रक्कम २१ हजार रुपये, सहावा क्रमांक रोख रक्कम १ हजार रुपये अशी बक्षीसे राहणार आहेत. सदरच्या बैलगाडी शर्यतीत एक आदत, एक बैल आणि एक दुसा, एक बैल अशी शर्यत राहणार आहे. सदरच्या शर्यतीमध्ये प्रवेश फी १५०० रुपये राहणार आहे.

सदर मैदानाचे समालोचन सुनील मोरे, पेडगाव हे करणार आहेत. तरी बैलगाडी चालक-मालक यांनी प्रतीक जानकर एकशिव ८६९८०६५२०६, पिंटू जगदाळे, शिंदेवाडी ९७६७१२३४११, मयूर पाटील, कुरबावी ७०५७१५८३४७, सचिन चव्हाण गुरसाळे ९३०७३८०९८०, बापू सरपंच डोंबाळवाडी ९९६०५६४२७९, महादेव केसकर डोंबाळवाडी ९०९६४३१२४७ या नंबरशी संपर्क साधावा, असे समाजरत्न दत्तात्रेय शेळके व मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसोलापूर जिल्ह्यात अन माळशिरस तालुक्यात आजवर कधीच एवढा मोठा वाढदिवस कोणाचा झाला नाही पुढे कुणाचा होईल की नाही शक्यता नाही – समाजभूषण सुरेश शेंडे
Next articleपवनकुमार जाधव याने रेखाटलेल्या लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे स्केचचे अनेकांचे लक्ष वेधून घेतले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here