नानांच्या परसबागेतील विविध फळझाडे तसेच औषधी झाडांना भेट दिली.

बऱ्हाणपूर (बारामती झटका)

मागील ३ वर्षापासून परिचय असणारे नाना. यांची आज त्यांच्या बऱ्हाणपूर या गावी आवर्जून भेट घेतली. तशी अधूनमधून त्यांची भेट घेतच असतो, पण ही भेट म्हणजे धावती भेट होती. आजची भेट निवांतपणे गप्पा मारून जवळपास दीड तासाची होती.

थोडक्यात नानांचा परिचय म्हणजे मा.श्री. जयसिंगराव दादासाहेब वाबळे उर्फ नाना यांनी २-९-१९६८ ते १-३-२००६ या कालावधीत ३८ वर्ष पोलिस निरिक्षक (PI) म्हणून नोकरी केली. त्यांना १५ ऑगस्ट २००१ रोजी राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ते ७४ वर्षाचे असून देखील शरीराने एकदम मजबूत आहेत. त्यांना शेतीची खुप आवड असल्यामुळे ते सध्या शेतीच करतात. आज त्यांच्या घराच्या गेट जवळ गेलो आणि दुचाकिचा हाॅर्न वाजवला. नाना भुईमुगाच्या शेंगा वाळवत होते. हाॅर्न वाजला कि मला पाहिले आणि खुप आदराने म्हणाले अरे वा या समीर या, नानांच्या जवळ गेलो कि म्हणाले तुम्ही माळरानावर फुलवलेली हिरवळ पाहून खुपच आनंद वाटला. आणि ८ जुनचे वन भोजन तर खुपच छान होते. मी पुन्हा एकदा निवांत येणार आहे बरं का. त्यावर झाडांना भेट देण्यासाठी ?, असे असे नाना म्हणाले. दोघेही खुर्चीवर बसलो. नाना घरातून मला पिण्यासाठी पाणी आणि कोकमचा रस घेऊन आले. रस पित असताना हिरवळलेली झाडे पाऊन मला खूपच आनंद झाला. नानांना म्हटले झाडे खुपच छान वाढलेली आहेत. आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे सर्व झाडे देशी आहेत हे पाहून खुप आनंद वाटला. आवळा, कोरफड, पपई, जांभळं, सीताफळ, नारळ, बहावा, आंबा, कडूलिंब, साग, चिक्कू, पेरू, कडिपत्ता, रामफळ, मोसंबी, गवती चहा, तोंडली, शेवगा, जास्वंद, लिंबूनी, तुळस, आळू, गोसावळे, चिंच, निरगुडी, रानभेंडी, झेंडू अशा विविध प्रकारच्या झाडांनी भरलेली नानांची परसबाग पाहत होतो. नाना मला सर्व झाडे फिरवून दाखवून पटापट नावे सांगत होते आणि ब-याच झाडांचे फायदे देखील सांगत होते. याचा मला खुपच आनंद वाटला. खुप कमी जागेत वेगळ्या ५० हुन अधिक झाडांची परसबाग नानांनी बनवली. नानांनी मला पेरू, आंबा, तोंडली असा रानमेवा खाण्यासाठी दिला.

नानांकडून आज खरचं खुप काही शिकलो. त्याचा मला नक्कीच पुढील माझ्या कामात मदत होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअवैध दारू प्रतिबंधात्मक माळशिरस तालुका सदस्य पदी नितीन वाघमारे यांची नियुक्ती
Next articleरत्नत्रयचा दहावीचा निकाल 100% , आमदार रामभाऊ सातपुते यांनी दिल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here