नायगाव ( बारामती झटका) माधव धडेकर यांजकडून
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती इंदिरा सार्वजनिक वाचनालय नायगाव येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार ( ACJP) संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष गौतम केरबा धडेकर साहेब यांच्या शुभहस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
गाडगे महाराजांचा जन्म दि. २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेगांव येथे झाला. गाडगे महाराज यांचे बालपण मुर्तिजापुर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामांच्या गावी गेले. गाडगे महाराजांनी वयाच्या आठव्या वर्षापासून आपल्या घरातील विपन्न परिस्थितीचे, आपल्या समाजाच्या मागासलेपणाचे, समाजाच्या अडाणीपणाचे निरीक्षण केले. महाराजांनी आपल्या मामाची शेती स्वतःच्या अपरिमित परिश्रमातून फुलवून अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा असलेल्या आपल्या समाजापुढे आपल्या श्रमांचा आदर्श ठेवला आहे. यावेळी जयंतीचे अध्यक्ष नायगाव नगरपंचायतचे नगरसेवक प्रतिनिधी सुनील सोनकांबळे, सचिन वाघमारे, जयराज पांढरे, आकाश मेटकर, सोनू बच्छाव, सुरज काळेवार, संदेश झुंजारे आदीसह अनेक वाचक उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng