नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात; दीर्घ प्रतीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा झाला प्रारंभ

इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून

गेल्या दीड वर्षापासून राज्यात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये कोरोनाची दहशत पहायला मिळतेय. कित्येक कालावधीनंतर बंद असणाऱ्या शाळा पुन्हा सुरु झाल्यात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने सोमवार दि.०३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्रारंभ केला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर मधील श्री. नारायदास रामदास हायस्कूलमध्ये प्रत्यक्ष लसीकरणाला सुरवात झाली असून विद्यार्थी आणि पालकांमधील संभ्रमावस्था दूर झाल्याने विद्यार्थ्यांनी देखील या लसीकरणास भरघोस प्रतिसाद दिल आहे.

दीर्घ कालावधीनंतर शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. उशिरा का होईना पण कोरोनाची लस मिळाल्याने कोरोनापासून संरक्षण होईल, शिवाय संसर्ग वाढण्यास अटकाव बसून शाळांना पुन्हा टाळा लागणार नाही, असा विश्वास सानिका आनंत देशमाने या विद्यार्थ्यांनीने व्यक्त केला आहे. कोरोनामुळे आमच्या मनामध्ये भीती होती, यामुळे आमचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षासुद्धा पुढे ढकलल्या गेल्यामुळे ते तणावात आहेत. त्यामुळे कोरोनाची लस घेणे अत्यंत गरजेचं होते. आम्ही लसीकरणाची आतुरतेने वाट पाहत होतो, असं मत अंतरा मलठणकर या विद्यार्थिनीने व्यक्त केले आहे.

लसीकरण घेण्यापूर्वी मनामध्ये भीती होती मात्र, लस घेतल्यानंतर ती भीती दूर झाली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी लस घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र लसीकरण घेतले म्हणून नियम धाब्यावर ठेवून चालणार नाही तर त्या नियमाची पुरेपूर अंमलबजावणी आपणास करावी लागेल असे श्रुती ज्ञानदेव मोरे या विद्यार्थिनीने सांगितले आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळा आणि रुग्णालयातील रांग एकाच वेळी दोन्ही शक्य नसल्याने शैक्षणिक संस्थांनी आणि आरोग्य विभागाने एकत्रित रित्या शाळेमध्येच विद्यार्थ्यांचे लसीकरण केल्याने विद्यार्थ्यांचा वेळ वाचला याबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार 3 जानेवारी २०२२ पासून नारायदास रामदास हायस्कूलमध्ये या १५ ते १८ वयोगटातील २ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी असून शाळेतील शिक्षक कर्मचारी व आरोग्य विभागाच्या मदतीने हे लसीकरण होत असून विद्यार्थी आनंदी आहेत. वय वर्षे १५ ते १८ मधील इयत्ता ११ वी आणि १२ वी चे १२१५ तर इयत्ता ९ वी आणि दहावी चे ९५४ असे एकूण नारायणदास रामदास हायस्कूलकडे २१६८ विद्यार्थी संख्या आहे. सर्व विद्यार्थ्यांना लस दिली जाणार असल्याचे मुख्याध्यापक विकास फलफले यांनी सांगितले आहे.

या कामी नवनाथ गाडे, उमेश घोगरे, भाऊ झगडे, संदीप अनभुले, दत्तात्रय दिघे, ज्योती सावंत, उशा कर्डे, स्वप्निल गलांडे, स्वप्निल पवार, गणेश बनकर, ब्रम्हदेव तावरे, राजश्री पांढरे, मेघा येडे, विज्ञान विभागप्रमुख औदुंबर चांदगुडे, इस्माइल जमादार, नंदकुमार यादव आदी शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी योगदान दिले. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील अंकुश बाळगाणुरे, वृक्षाली नवगिरे यांसह त्यांच्या सहकार्यांनी हे लसीकरण पार पाडले.

“गेल्या दोन वर्षात कोरोना मुळे शाळा बंद होत्या आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी लस घेणे गरजेचे आह. शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रथमच सोमवार पासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लस घेऊन आणि सर्व नियमावली पाळून आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे असे आवाहन संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांनी केले आहे.”

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महास्वच्छता अभियानाचे आयोजन
Next articleवसुंधरेच्या रक्षणाबरोबरचं उत्तम आरोग्यासाठी न घाबरता लसीकरण करा; अंकिता शहा यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here