मोफत पिशवी देण्याची मोर मेगास्टोअर्सला ग्राहक मंचचे आदेश
हैदराबाद (बारामती झटका)
आपल्या कंपनीचे नाव आणि लोगो छापलेल्या कॅरीबॅग देऊन ग्राहकांकडून तीन रुपये घेणे, ही अनिष्ट व्यापार प्रथा असल्याचे ठरवत हैदराबादच्या ग्राहक मंचचे मोर मेगा स्टोअर्सला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आकाश नावाच्या विद्यार्थ्यांनी या विरुद्ध ग्राहक मंचकडे तक्रार दाखल केली होती. मोर मेगा स्टोअर्सने त्यांची प्रिंटेड पिशवी विकत घेऊन ग्राहकाचा जाहिरात प्रतिनिधी म्हणून वापर करून घेतल्याचे त्याचे म्हणणे होते. ग्राहक मंचने हे म्हणणे मान्य करून तीन रुपये परत करण्याची व सेवेतील त्रुटी बद्दल १५ हजार रुपये दंड देण्याचे आदेश दिले आहेत.
मेगा स्टोअर्सचे मुद्दे
१) मेघा स्टोअर्स प्लास्टिक वापरास प्रोत्साहन देत नाही. तसे फलक त्यांनी स्टोअरमध्ये लावले आहेत. फलकावर घरून पिशवी आणावी न आणल्यास विक्रीसाठी उपलब्ध आहे, असे लिहिले आहे.
२) पिशवी विकत घेणे ऐच्छिक आहे. ती जबरदस्तीने दिली जात नाही.
३) कॅरीबॅगचे पैसे घेण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही.
ग्राहक मंचाचा निकाल
१) आपले नाव आणि बोधचिन्ह छापलेली पिशवी देऊन व त्याची किंमत वसूल करून ग्राहकाचा जाहिरातीसाठी उपयोग करण्यात आला आहे आहे. ही अनिष्ट व्यापार प्रथा आहे. म्हणून ती सेवेतील त्रुटी ठरते.
२) कंपनीचा हा छुप्या पद्धतीने केलेला बनाव आक्षेपार्ह आहे.
३) नाव न छापलेली पिशवी विकता येईल, पण तिची किंमत दर्शविणारे फलक दर्शनी भागात लावले पाहिजेत.
४) कंपनीकडे छापलेल्या पिशव्या असतील तर त्या ग्राहकांना मोफत द्याव्यात.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng