माळशिरस ( बारामती झटका )
तारीख १९/०१/२०२२ रोजी ना.अशोकराव चव्हाण साहेबांच्या शासकीय निवास स्थानी कांही मराठा समाजाचे कांही मंडळी, विरोधकांच्या चेतावणी ने आंदोलनात उतरले,पण ते मराठा क्रांती मोर्चाचे खरे कार्यकर्ते नाहीत.ना.अशोकराव चव्हाण साहेब मराठा आरक्षणा बाबत नेहमी सकारात्मक असतात, त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणा बाबत आता पर्यंत खुप प्रयत्न केले आहेत व त्यांचे काम चालुच आहे.कोर्टातील मराठा समाजाच्या वतीने ते बाजु संभाळत असतात पंतप्रधान मा.ना.मोदीसाहेब,व विरोधी पक्ष व दिल्लीतील अनेक दिग्गज नेत्यांच्या त्यांनी भेटीगांठी घेतल्या मराठा आरक्षणा बाबत आपली ठोस भूमिका मांडली आरक्षण कसे मिळेल, त्यासाठी काय करावे लागेल यांचा ना.चव्हाणसाहेबांनी सखोल अभ्यास करुन आपली भुमिका स्पष्ट केलेली आहे त्याची दखल महाराष्ट्रतील मराठा समाजाने घेतली आहे.मराठासमाजाला आरक्षण मिळवुन देणारे खंबीर नेतृत्व ना.अशोकराव चव्हाण यांच्या शिवाय दुसरे कोणी करु शकत नाही,असे ठाम मत
आपला युवक शेतकरी फोरम चे मुख्य प्रवर्तक व मराठा क्रांती मोर्चा सदस्य ॲड एम एम मगर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
ना.अशोकराव चव्हाण यांची मराठा आरक्षणा बाबतची भुमिका पटवुन देण्याची आम्ही जबाबदारी घेतली आहे,ना.अशोक चव्हाण व सर्व मराठा समाज नेते, कार्यकर्ते व हिंत चिंतक यांचे आरक्षण मिळणे बाबतचे प्रयत्न चालु आहेत.त्यात कांही कायदेशीर बाबी, न्याय प्रविष्ट बाबी व राजकीय अडथळे यातुन मार्ग निघेल असा विशवास ॲड एम एम मगर यानी व्यक्त केला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng