निमगांव (म.) (बारामती झटका)
शिवजंयती निमीत्त रक्तदान शिबीर निमगांव येथे शिवप्रेमी तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी मनसे विधानसभा अध्यक्ष कुंडलिकराजे मगर, शिवप्रेमी तरुण मंडळ्याचे अध्यक्ष लक्ष्मण पवार, पुढारीचे पञकार रामचंद्र मगर, पै. विष्णुपंत मगर, डाॅ. मयूर माने, डाॅ. नितिन पवार, डाॅ. तानाजी मगर, मारूती पवार, पै. दत्ता मगर, ज्ञानेश्वर शेंडे, विजय मगर, मल्हारी गायकवाड आदी उपस्थित होते.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी राणोजी मगर, सुर्दशन पवार, महादेव मगर, अनिल शेंडे, सोहम मगर, ज्ञानेश्वर मगर, आदींनी परिश्रम घेतले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng