निमगाव (म.) (बारामती झटका)
निमगाव (म.) ता. माळशिरस येथे सालाबादप्रमाणे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरात ७५ दात्यांनी रक्तदान केले.
सकाळी निमगावच्या सरपंच सौ. आरती मगर, मल्लसम्राट रावसाहेब मगर, माजी सरपंच पांडुरंग मगर, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, ग्रामपंचायत सदस्य सुनील मगर, उद्योजक विराजशेठ मगर, पै. दत्ता मगर, दादासो पवार, आबासो सावंत, युवा नेते दत्ता मगर, जयसिंग मोरे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष प्रतीक मगर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले.
या रक्तदान शिबिरामध्ये 75 रक्तदात्यानी रक्तदान करून छत्रपती संभाजी महारजांना अभिवादन केले. यावेळी संभाजी ब्रिगेड तर्फे रक्तदात्यांना प्रोत्साहन म्हणुन प्रत्येक रक्तदात्याला एक बॅटरी भेट म्हणुन देण्यात आली.
त्यानंतर सायंकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीला महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
संभाजीराजांची जयंती साजरी करण्यासाठी विशाल मगर, ऋषिकेश मगर, शुभम मगर, अविनाश मगर, योगीराज मगर, प्रणय मगर, बबलू सावंत, प्रशात मगर यांनी कष्ट घेतले व सामाजिक भान ठेऊन रक्तदान केलेल्या दात्यांचे प्रतीक मगर यांनी आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng