निमगाव ( बारामती झटका )
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्यावतीने ४ ऑक्टोबर २०२१ पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून सॅनिटायझर आणि मास्क याचा वापर केला होता. यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेच्या प्रवेशद्वारात रांगोळी काढून पुष्पवृष्टी करण्यात आली.
आर्य वैश्य कमिटी व प्रितम फाउंडेशनच्यावतीने वह्या, पुस्तक, पेन, पेन्सिल व सर्व साहित्य तसेच गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तालुक्यातील इंनपायर पारितोषिक व शिष्यवृत्ती आशिष घुगे याला मिळाल्याबद्दल प्रशालेच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी जवाहर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार, मुख्याध्यापक रामचंद्र आसबे, हनुमंत पवार, सावणे मॅडम, सुश्रुषा इनामदार, सुरवसे सर, प्रा. सचिन मगर, रामचंद्र मगर आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी धनाजीराव जाधव यांनी आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng