निरामाईच्या कुशीत वसलेल्या,जिल्ह्य़ापासून शेकडो मैल दूर असलेल्या चाकोरे गावाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट.

चाकोरे ( बारामती झटका )


आज दि.1जानेवारी 2022 रोजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रामपंचायत चाकोरे -प्रतापनगर, आरोग्य उपकेंद्र,व जि.प.शाळा चाकोरे येथे जिल्हाधिकारी मा.श्री. मिलिंद शंभरकर साहेब , तहसिलदार मा.श्री. जगदीश निंबाळकर साहेब ,सहाय्यक गटविकास अधिकारीश्री. पाटीलसाहेब यांनी भेट दिली.यावेळी जि.प.सदस्या सौ.मंगलताई वाघमोडे, डॉ.संकल्प जाधव साहेब , डाॅ.फुंदेसो,श्री.बालाजी आल्लडवाडसो व पर्यवेक्षिका सौ.कुलकर्णी मॅडम उपस्थित होत्या.


यावेळी साहेबांनी कोरोना लसीकरण आढावा व उर्वरित लसीकरणाच्या नियोजना संदर्भात चर्चा केली. त्या नंतर साहेबांचा ताफा सरळ ऊसतोड कामगांच्या छावणीतगेला.साहेबांनी त्यांना लसीचेमहत्व पटवून दिले त्यामुळे लगेच छावणीत लसीकरण मोहिम राबवली.जि.प.शाळेत 3 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या मेंदूज्वर या लहानमुलांच्या लसीकरणाच्या नियोजनाबाबत चर्चा कली.


कोव्हीड चे 98 %लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल जि.प.सदस्या सौ.मंगलताईवाघमोडे,सरपंच सौ.अर्चनाताई शिंदे,उपसरपंच दादासो भंडलकर, ग्रामस्तरीय समीती,आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी,जि.प.चे शिक्षक,ग्रा.पं.चे सर्व कर्मचारी,आशावर्कर वअंगणवाडी सेविका यांचे विशेष कौतुक केले व समाधानव्यक्तकेले.

ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांचा सत्कार सौ.मंगलताई वाघमोडे व सौ.अर्चनाताई शिंदे यांच्याहस्ते तर तहसीलदार साहेब व इतर सर्वांचा सत्कार उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सरपंच श्री. किरणआप्पा वाघमोडे, संचालक श्री. लक्ष्मणराव शिंदे , ग्रा.पं. सदस्य श्री.सचिन कचरे,ग्रा.पं.सदस्य श्री.नवनाथ जाधव,ग्रा.पं.सदस्य श्री.सुरेश आबा पाटील,अॅड.श्री. चंद्रकांत शिंदे,संतोष शिंगटे,आबासो गायकवाड, हरीभाऊ डोंबाळे,ग्रामसेवक मानेसाहेब,तलाठी शिंदेभाऊसाहेब,आरोग्य कर्मचारी,सर्व अंगणवाडी सेविका,ग्रा.पं.स्टाफ,शिक्षक स्टाफ,आशा सेविका व अनेक नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बाळासो शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन.दत्तात्रय माने यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउसाला तुरा का पडतो ? त्याचे परिणाम काय होतात.
Next articleलोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा मळोलीकरांच्या वतीने सन्मान संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here