माळशिरस (बारामती झटका)
शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी कॅनालची आवश्यकता असते. गेली अनेक वर्षे नीरा देवधर हा प्रकल्प तयार होऊन अनेक वर्ष कॅनलचे काम झालेले नाही. ते काम पूर्ण होण्यासाठी व माळशिरस तालुक्यातील वंचित राहिलेल्या सहा गावांचा या योजनेमध्ये समावेश होण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना काल निवेदन देण्यात आले. यावेळी नीरा देवधर हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर, मार्गदर्शक शंकरनाना देशमुख, पत्रकार संघाचे अध्यक्ष निनाद पाटील, सचिव आनंद शेंडगे सर, रेडेचे सरपंच आप्पासाहेब शेंडगे, गणेश माने, गणेश काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील साहेब यांनी लवकरच मुंबई येथे धर्मपुरी होऊन उचल पाणी देण्याच्या बाबतीत या योजने संदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबई येथे बैठक लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. योजनेबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. बाळासाहेब सरगर यांनी भाजपच्या काळामध्ये बंद पाटलांनी मधून पाणी देण्याची योजना मंजुरी दिली आहे. परंतु निधीची तरतूद न झाल्याने ही योजना पुढे लागू झाली नाही. त्यामुळे नवीन योजनेप्रमाणे टेल टू हेड याप्रमाणे धर्मपुरी येथे बंद पंपहाऊस बांधून पाच-सहा किलोमीटर पाणी उचलून कॅनाल तयार केल्यास माळशिरस तालुक्यातील 22 गावांना योजनेचा फायदा होऊ शकतो. या नीरा देवधर कॅनल लाभक्षेत्रात वगळण्यात आलेल्या गारवड, मगरवाडी, चांदापुरी, शेंगुर्णी, जळभावी, बचेरी, सुळेवाडी या गावांचा समावेश करणेबाबत व उचल पाणी योजने सविस्तरपणे चर्चा जलसंपदा मंत्री जयंत पाटील याचे समवेत झालेने यांनी लवकरच मुंबई येथे मिटींगला लावणेबाबतचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng