नीरा देवधर धरणाचे पाणी माळशिरस तालुक्यातील 16 गावाला लिफ्ट पद्धतीने देणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब माळशिरस तालुक्याच्या खाजगी दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरराव देशमुख यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी निरा देवधर पाणी हक्क संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक या समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांच्यासमवेत घेण्यात आली.

यावेळी या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. रामदास देशमुख व नियोजन समिती सदस्य सुरेश पालवे यांनी या प्रश्नावरती जयंत पाटील साहेब यांना विशेष लक्ष घालण्याचा आग्रह केला. त्यांनी या भागाला मोरोची याठिकाणी पंपगृह बांधून हे पाणी उचल कोथळे या ठिकाणी सोडून तिथून पुढे कॅनॉलचे काम करणार असून ते काम टेल टू हेड या पद्धतीने देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगून मुंबई येथे विशेष बैठक लावण्याच्या आदेश पत्रावरती त्यांनी दिले.

या कॅनॉलच्या कामामुळे माळशिरस तालुक्यातील कोथळे, कारूंडे, पिंपरी, फडतरी, लोंढे मोहितेवाडी, लोणंद, गिरवी, भांब, रेडे, माणकी, इस्लामपूर, गोरडवाडी, गारवाड, मगरवाडी, पठाणवस्ती या गावांचा यात समावेश होणार आहे‌. कॅनालमुळे गेले अनेक वर्षे दुष्काळामध्ये जगणार्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होणार आहे‌ तसेच या कार्यक्षेत्रामध्ये न येणाऱ्या व कायम दुष्काळी वंचित असणाऱ्या सुळेवाडी, शिंगोर्णी, पठाणवस्ती या गावांचा समावेश करण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके, बाळासाहेब सरगर, रामदास देशमुख, शंकरराव देशमुख, सुरेश पालवे, कीर्तीराज देशमुख, राजाभाऊ हिवरकर, हनुमंत साळुंखे, निजाम काझी, सोमनाथ पिसे, वरूण धाईंजे आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजलसंपदामंत्री ना. जयंतरावजी पाटील यांचे पहिले पाऊल माळशिरस येथील शिवतीर्थ बंगल्यावर पडलं…
Next articleमांडवे गावातील संग्रामसिंह मोहिते पाटील सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी सुरेश साळुंखे सर तर, व्हाईस चेअरमनपदी अजिनाथ दुधाळ यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here