केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष रेखा शर्मा यांच्यासह अनेक महिला मान्यवरांची उपस्थिती.
सोलापुर (बारामती झटका )
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ इंडिया सोलापुर येथील मॅनेजर सौ. रुक्साना आसिफ आतार यांना नॅशनल वुमेन एक्सीलेंस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. नॅशनल युथ अवॉर्ड्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि विशाखा वेलफियर सोशल फाऊंडेशन नवी दिल्ली महाराष्ट्र सदनच्या प्रेस हॉलमध्ये दि. 9 मार्च 2022 रोजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. जागतिक महिला दिन सोहळ्याच्या निमित्ताने देशातील मान्यवर 55 महिलांचा नॅशनल वुमेन एक्सीलेंस अवॉर्ड 2022 प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रीय मानव अधिकार आयोग सदस्य डॉ. ज्ञानेश्वर म. मळे, राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा रेखा शर्मा, दिल्ली मायनॉरिटी कमिशनच्या सदस्या नॅन्शी बारलो, मागास व भटके विमुक्त आयोगचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकू (दादा) रामजी इदाते, नॅशनल युथ अवॉर्ड्स फेडरेशन ऑफ इंडिया व डॉ. विशाखा वेलफियर सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष व संत गाडगे बाबा विद्यापीठाचे राज्यपालनामित सिनेट सदस्य डॉ. मनिष गवई दिल्ली आदी मान्यवर व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी हजर होते.

सौ. रुक्साना आत्तार या मार्केटयार्ड येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काम करीत आहेत. तर त्यांचे पती आसिफ आत्तार हेही बँक ऑफ इंडियाच्या सोलापुर येथील मुख्य शाखेत मॅनेजर म्हणून काम करतात. सोलापुर जिल्हा बँक ऑफ इंडियाच्या इतिहासतील हा पहिलाच राष्ट्रीय महिला पुरस्कार असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng