कल्याण (बारामती झटका) गुरुनाथ तिरपणकर यांजकडून
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून रोजी कल्याण येथील वृक्षप्रेमी श्री. विजय बर्गे यांचा त्यांचा नैसर्गिक पर्यावरण कार्यातील विशेष प्राविण्याबद्दल कल्याणच्या नेफडो शहर अध्यक्षा मा. अनिता प्रविण कळसकर यांनी सत्कार केला. वृक्षांची फक्त लागवड करून भागत नाही तर वृक्षांचे संगोपन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तरुण कार्यकर्ता विजय बर्गे यांनी अनेक झाडे लावुन त्यांचे संगोपन कसे करावे, हे मुलांना शिकविले.
आपणही या धरतीचे ऋण लागतो, बालपणापासून अनेक झाडे लावुन मी मोठी केली, त्यांचे संगोपनही छान केले. आज मात्र खूप वर्षांनी झाड लावण्याची संधी मिळाली आणि मनसोक्त मातीत हुंदडायला मिळाले याचाही आनंद अनिता कळसकर यांच्या चेह-यावर झळकत होता. हा कार्यक्रम सोसायटीच्या आवारात कोरोनानंतर प्रथमच राबविण्यात आला होता. यावेळी दोन कडुलिंब, अशोकाची दोन झाड तसेच एक शो च झाड सोसायटीच्या आवारात लावण्यात आली. हल्ली कडुलिंब खूप कमी प्रमाणात रस्त्यावर दिसतात. आपल्या मातीत रुजणारी व औषधी झाडांचे प्रमाण कमी होत असताना आपण सर्वांनी यात सहभागी होऊन निसर्गाची काळजी घ्यावी. याप्रसंगी सोसायटीतील मुलांनी आणि काही नागरीकांनी झाड लावुन सहकार्य केले. सर्वांचे धन्यवाद मानुन कार्यक्रमाची सांगता झाली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng