नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राष्ट्रवादी किसान सेलची मागणी.

पुणे (बारामती झटका)

राज्यातील सत्तातरानंतर महाराष्ट्रात येणारा वेदांत-फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्राचे झालेल्या नुकसान प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सेलचे तालुका अध्यक्ष सचिन नलवडे पाटील यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना खनिकर्म क्षेत्रातील वेदांत आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणारी तैवानची फाॅक्सकाॅन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार हे निश्चित झाले होते. प्रकल्पासाठी पुणे तळेगाव येथे जागाही ठरली होती. मग शिंदे सरकार आल्याबरोबर कुठे माशी शिंकली आणि हा प्रकल्प थेट गुजरातला गेला, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनता विचारत आहे. तब्बल दीड लाख कोटी रूपयांची गुंतवणूक असणारा आणि लाखाच्या जवळपास तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा देशातील पहिला सेमीकंडक्टर निर्मितीचा हा प्रकल्प होता. यामुळे पुन्हा एकदा राज्य औद्योगिक क्षेत्रात मागे पडले. महाराष्ट्रात नव्हेतर गुजरातमध्ये परिणामी देशात हा प्रकल्प होणार असल्याने आम्हाला अभिमान देखील आहे.

महाराष्ट्रात केवळ हनुमान चालिसा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्र, भोंगे यातून तरूणांना रोजगार नाहीतर बेरोजगारी निर्माण होईल. हिंदुत्वाची गर्जना करून सण, उत्सव साजरे जरूर करा पण त्यासोबत राज्यातील तरूणांच्या हाताला प्राधान्याने काम द्या. वेदांत फाॅक्सकाॅन प्रकल्प पुणे जिल्ह्यात होणार होता, म्हणून गुजरातमध्ये स्थलांतरीत केला का ?, राज्यातील लाखो तरूणांना बेरोजगारीच्या गर्तेत आपण (सरकारने) लोटले आहे, हे जळजळीत सत्य नाकारून चालणार नाही. तेव्हा मुख्यमंत्री महोदय नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामा द्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी किसान सेलच्यावतीने करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराजकारण, समाजकारण व आदर्श गृहिणी असणाऱ्या स्वर्गीय सौ. वत्सल्ला विजयकुमार बाजारे यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे
Next articleКомпания Roboforex: официальный сайт и контакты, фирма “Компания Roboforex” Санкт-Петербург: телефон и адрес, отзывы, часы работы компании на Orghost ID 1371520

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here