न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागणार आंदोलन उपोषण करून गेंड्याच्या कातडीचे अधिकारी निर्धास्त आहेत – हर्षदभाऊ भोसले

सह. दुय्यम निबंधक इंदापूर, दौंड, बारामती, तळेगाव, ढमढेरे, बारामती, वडगाव, मावळ, लोणावळा बोगस दस्तांची चौकशी करण्यासाठी टोकाचं पाऊल उचलले.

पुणे ( बारामती झटका )

सह. दुय्यम निबंधक इंदापूर, दौंड, बारामती, तळेगाव, ढमढेरे, बारामती, वडगाव, मावळ, लोणावळा या ठिकाणी केलेल्या बोगस दस्तांची चौकशी करा. अन्यथा पुणे येथील मुद्रांक निरीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिलेला होता. मात्र कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याकरता वरिष्ठ अधिकारी गेंड्याच्या कातडीची भूमिका घेत आहेत. त्यामुळे न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे हर्षदभाऊ भोसले यांनी दिलेली आहे.

संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे हर्षदभाऊ भोसले यांनी पुणे येथील नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिलेले होते. सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, सहाय्यक दुय्यम निबंधक इंदापूर या ठिकाणी प्रभारी म्हणून कार्यरत असलेले अरुण आव्हाड व देवशाली हिंगमिरे मॅडम यांनी केलेल्या बोगस दस्त तसेच त्यांच्या कार्यकालामध्ये केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी आम्ही अर्ज करत आहोत. रेरा, तुकडाबंदी असताना देखील हे अधिकारी कायद्याचे उल्लंघन करून आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाचा महसूल बुडवून स्वतःच्या तिजोऱ्या भरत आहेत व बेहिशोबी मालमत्ता गोळा करत आहेत. यांना संबंधित वरिष्ठ अधिकारी सहकार्य करत आहेत. त्यांना विचारपूस केली असता ते सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सांगत आहेत. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने पुणे शहरात कारवाईचे सत्र ठेवले आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पोलखोल केला, निलंबनाची कारवाई केली, त्यामुळे जनसामान्य माणसांमध्ये आपल्याबद्दल जो अभिमान वाटू लागला. यांच्यावरती कारवाई करणारे वरिष्ठ अधिकारी आहेत. परंतु, एक गोष्ट आम्हाला समजत नाही, कित्येक वर्ष पुणे ग्रामीणला एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस दस्ताचे काम चालू आहे.

इंदापूर, दौंड, तळेगाव, ढमढेरे, बारामती, वडगाव, मावळ, लोणावळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असताना देखील कारवाई होत नाही. जशी पुणे शहरामध्ये कारवाई होते, तशी पुणे ग्रामीणला कारवाई होताना दिसत नाही. या मागणीसाठी दि. 10/05/2022 रोजी मुद्रांक निरीक्षक पुणे यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देऊन देऊन विनंती आहे की, आपण कागदपत्राची योग्य ती शहानिशा करून निलंबनाची कारवाई करावी. सोबत पुरावे कागदपत्रे जोडत आहोत. अशा आशयाचे निवेदन महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, विरोधी पक्षनेते विधानसभा विधान परिषद, नोंदणी महानिरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंद गार्डन पोलीस स्टेशन पुणे यांना देण्यात आलेले होते. वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांना आर्थिक देवाण-घेवाणीमुळे पाठीशी घालत आहेत. सदर पुराव्याच्या आधारे न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचे हर्षदभाऊ भोसले यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमोटेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन
Next articleश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ४९ वा गळीत हंगामाचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here