पंचायत राज समिती दौर्‍याने माळशिरस पंचायत समिती हादरली, अधिकारी व कर्मचारी अलर्ट

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाल संपल्याने लुडबुड थांबणार, अधिकारी धारेवर धरले जाणार.

माळशिरस ( बारामती झटका )

पंचायत राज समिती दौरा सोलापूर जिल्ह्यात दि. 15/06/2022 ते 17/06/2022 या कालावधी करता महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय मुंबई येथील अपर सचिव यांनी पंचायत राज समिती प्रमुख व सदस्य यांच्या नेमणुका करून अधिकारी व सहाय्यक यांच्याकरिता अधिकाऱ्यांची नेमणूक केलेल्या आहेत. सध्या सोलापूर जिल्हा परिषद व माळशिरस पंचायत समिती सह सर्व पंचायत समितीच्या सदस्यांचा कालावधी संपलेला असल्याने नागरिकांच्या प्रश्न उत्तराच्या वेळी सदस्यांची लुडबुड थांबणार ? अधिकारी जनता धारेवर धरणार अशी माळशिरस तालुक्यात चर्चा सुरू आहे.

पंचायत राज समिती प्रमुख संजय रायमुलकर हे आहेत. सदस्यांमध्ये सर्व विधानसभा सदस्य आहेत. प्रदीप जैस्वाल, कैलास पाटील, डॉ. राहूल पाटील, अनिल पाटील, संग्राम जगताप, दिलीपराव बनकर, शेखर निकम, सुभाष धोटे, माधवराव पवार, प्रतिभा धानोरकर, हरिभाऊ बागडे, डॉ. विजयकुमार गावित, डॉ. देवराव कोळी, कृष्णा गजबे, विजय रहांगडाले, राणा जगजितसिंह पाटील, प्रशांत बंब, मेघना बोर्डीकर साकोरे, किशोर जोरगेवार, अंबादास दानवे, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, निरंजन डावखरे, सुरेश धस, निमंत्रीत सदस्य किशोर पाटील, जयंत पाटील, बाळाराम पाटील, किशोर दराडे, रत्नाकर गुट्टे , महादेवराव जानकर, सदाशिव खोत अशा 32 विधानसभा सदस्यांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सर्वांची बैठक संपन्न होऊन सदर ठिकाणी सन 2015 -16 व 2016-17 च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवाल आणि सन 2017 -18 च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषद भेट देणार आहेत. अकरा जिल्हा परिषदसाठी सदस्यांची नेमणूक करून त्यांना संपर्क अधिकारी नेमलेले आहेत. संपर्क अधिकारी म्हणून आवश्यक ती जबाबदारी व कर्तव्य पार पाडावी. सदर कामी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा अथवा कामचुकारपणा केल्याचे निदर्शनास आल्यास आपणा विरुद्ध योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्रान्वये कळविलेले आहे.

पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी हे प्रशासक म्हणून काम करीत आहेत. अधिकारी व कर्मचारी यांनी धास्ती घेतलेली आहे. जनता पंचायत राज समितीसमोर कोणते प्रश्न व मुद्दे उपस्थित करतील याचा नेम नाही.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचि. डॉ. आशिष मोटे पाटील फोंडशिरस आणि चि.सौ.कां. डॉ. सुवर्णा वाघमोडे पाटील उंबरे दहिगाव यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…
Next articleबोंडले विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा धुराळा उडवून सुपडा साफ…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here