माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्रीकांत अशोककुमार खरात यांची पंचायत समितीच्या प्रशासकपदी नियुक्ती शासनाच्या आदेशाअन्वये झालेली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखा परीक्षण अधिनियम खालील भाग चार मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना याव्यतिरिक्त आदेश व अधिसूचना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961( सन 1962 चा 5 ) मधील कलम 91 ब व 75 व या कलमान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मुक्त जिल्हा परिषदांच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी व त्यांची कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि मुक्त जिल्हा परिषद अंतर्गत 283 पंचायत समित्यांचे संबंधित गटविकास अधिकारी यांना मुक्त पंचायत समित्यांच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी व त्यांचे सर्व कर्तव्य पार पाडण्यासाठी अनुक्रमे दि. 20 मार्च 2022 व दि. 13 मार्च 2022 पंचायत समिती धारणी करता दि. 24 जून 2022 नंतर पासून पुढील चार महिन्यापर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती व सरपंच, समितीचे सभापती यांची पदे निवडणुकीद्वारे भरले जातील. यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत प्राधिकृत करीत आहेत, असे महाराष्ट्र शासनाचे अतिरिक्त चीफ सेक्रेटरी राजेश कुमार यांचा आदेशान्वये प्रशासकांच्या नियुक्त्या होणार आहेत.
माळशिरस पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल दि. 13 मार्च 2022 रोजी संपलेला असल्याने दि. 14 मार्च 2022 रोजी पासून माळशिरस पंचायत समितीवर प्रशासक म्हणून कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्रीकांत खरात हे काम पाहणार आहेत. श्रीकांत अशोककुमार खरात हे फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2014 रोजी परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश मिळवून गटविकास अधिकारी पदी त्यांची नेमणूक झालेली होती. श्रीकांत खरात यांनी अकोले, वर्धा, करमाळा अशा पंचायत समित्यांमध्ये काम केलेले आहे. दि. 06/09/2021 रोजी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पदाचा पदभार घेतलेला आहे. सहा महिन्यांमध्ये माळशिरस पंचायत समितीचा कारभार गतीमान केलेला असून लोकाभिमुख पंचायत समिती केलेली आहेत. जनता आणि प्रशासन यांचा चांगल्या प्रकारे समन्वय केलेला आहे. अशा कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांच्याकडे पंचायत समितीचे प्रशासक पदी जबाबदारी आलेली असल्याने यशस्वीपणे व कर्तव्यात कसूर न करता जबाबदारी पार पाडतील अशी अपेक्षा जनतेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng