संभाजीबाबा क्रिकेट क्लब इस्लामपूर व अर्जुनसिंह मोहिते पाटील मित्र परिवार इस्लामपूर यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.
इस्लामपूर ( बारामती झटका )
माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर येथे 6/ 11/ 20 21 रोजी भव्य टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.

संभाजीबाबा क्रिकेट क्लब इस्लामपूर व अर्जुनसिंह मोहिते पाटील मित्रपरिवार यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. प्रथम बक्षीस 7001 रुपये व चषक गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री युवराज तुकाराम देशमुख यांच्या वतीने. द्वितीय बक्षीस 5001 रुपये व चषक श्री राज ॲग्रो एजन्सीज इस्लामपूर प्रोफाइटर दिलीप पोपट पवार यांच्या वतीने तृतीय बक्षीस 3001रूपये व चषक श्री हर्षद निंबाळकर युवा नेते यांचेकडून वैयक्तिक बक्षिसे मॅन ऑफ द सिरीज शंकर आवळे कॉन्ट्रॅक्टर पुणे 1100, मॅन ऑफ द मॅच फायनल पृथ्वीराज पवार उद्योजक 1001 उत्कृष्ट फलंदाज श्रेयश मेडिकल इस्लामपूर 701 रुपये उत्कृष्ट गोलंदाज अर्जुन पवार माजी उपसरपंच ग्रामपंचायत इस्लामपूर 501 रुपये, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण शेखर देशमुख युवा उद्योजक 501, शिस्तप्रिय संघ विलास पवार प्रगतशील बागायतदार 501, उत्कृष्ट झेल अजिंक्य मोबाईल शॉपी इस्लामपूर 501, उत्कृष्ट यष्टीरक्षक श्रीराम शिंदे चीट बोय 501, अशी आकर्षक बक्षिसे राहणार आहेत प्रवेश फी 400 रुपये राहील सामन्याचे नियम व अटी सामना सहा षटकांचा राहील, प्रत्येक संघात नऊ खेळाडू राहतील पंचांचा निर्णय अंतिम राहील, सामने बाद पद्धतीने खेळले जातील, सामने गाव वाईज भरवले जातील, तरी क्रिकेट प्रेमींनी नाव नोंदणीसाठी ऋषिकेश पवार 96 65 21 25 51, राज देशमुख, 93 56 51 76 76, महेश पवार, 86 00 10 47 42, सोनू देशमुख 86 00 10 33 64 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन अर्जंट विषयी माहिती पाटील मित्र मंडळ व संभाजी बाबा क्रिकेट क्लब इस्लामपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng