पंचायत समिती गणातील गावामध्ये विविध विकास कामांचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात शुभारंभ.
मेडद ( बारामती झटका )
माळशिरस पंचायत समिती सदस्या सौ. प्राजक्ता स्वप्नील वाघमारे यांच्या १५ वा वित्त शेष निधीतून पहिल्या टप्प्यातील विविध विकास कामे मंजूर झाले असून,,
• सार्वजनिक आर ओ वॉटर फिल्टर एटीएम सिस्टीम बसवणे – मेडद
• सार्वजनिक ठिकाणी मुतारी युनिट बसवणे – मेडद, तिरवंडी, उंबरे दहिगाव , चाकोरे
• जिल्हा परिषद शाळांसाठी आर ओ फिल्टर बसणे – उंबरे दहिगाव, तिरवंडी, कचरेवाडी, मारकडवाडी, मेडद.
• श्रीनाथ मंदिर सार्वजनिक सुविधा पुरवणे – मेडद
• सार्वजनिक ठिकाणी ओला- सुका कचरा विलगीकरण करण्यासाठी कचराकुंडी स्टॅन्ड बनवणे – चाकोरे , कचरेवाडी, तिरवंडी, उंबरे दहिगाव, मेडद, कदमवाडी, बागेचीवाडी, मारकडवाडी, कोंडबावी, गिरझणी या कामासोबतच मारकडवाडी, उंबरे दहीगाव, बागेचीवाडी येथे सौ. प्राजक्ता स्वप्नील वाघमारे, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल (भैय्या) वाघमारे, मारकडवाडी सरपंच अमित अण्णा पाटील, मेडद सरपंच युवराज तात्या झंजे , उंबरे दहिगाव चे सरपंच विष्णुपंत नारनवर, शिवसेना तालुका प्रमुख नामदेव नाना वाघमारे, शिवसेना तालुकासंघटक विरेंद्र अण्णा वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत,.

• मारकडवाडी येथील लक्ष्मी मंदिर ते बंधारे रस्ता खडीकरण करणे या कामाचे
•उंबरे दहिगाव येथील इनाम वस्ती ते गावठाण रस्ता खडीकरण तसेच
• गावठाण सार्वजनिक मुतारी युनिट उभा करणे या कामाचे
• बागेचीवाडी येथील लक्ष्मी माता मंदिर येथे पेव्हिंग ब्लॉक, आसन व्यवस्था व सुशोभीकरण करणे, तसेच
• जाधव वस्ती ते वरपे वस्ती (शिवनेरी तालीम) बंदिस्त गटार बांधणे या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

या विविध कार्यक्रमा प्रसंगी सुधीर बापू महाडिक, शंकर बापू पाटील, राजाभाऊ मारकड, बापू पिसाळ , कासलिंग वाघमोडे, भीमराव नारनवर विष्णू ठोंबरे, रामचंद्र ठोंबरे भीमराव समिंदरे, दत्तू ढेकळे , तानाजी वाघमोडे, वेताळ इंगळे साहेब , हनुमंत तात्या वाघमारे, नामदेव माने, राजू इंगोले, तानाजी पोतेकर, तुकाराम यादव, सतीश दडस, दिलीप गायकवाड, बाळासाहेब बनकर, आशाबाई बनकर , मयूर पिंगळे, विकी तिकुटे, शेख लाल शेख , वनिता जानकर सर्व ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng