श्री विठ्ठल कारखान्याचे सभासदांनो काळजी करू नका तुमचा ऊस 3000 रु. टनाने मी घालवतो.
पंढरपूर ( बारामती झटका )
सोलापूर जिल्ह्याच्या बॉण्ड्रीवर सांगली, सातारा, पुणे येथील साखर कारखाने टनाला 3000 रुपये सरासरी दर देतात व सोलापूर जिल्ह्यातील कारखाने अद्याप तोंड उघडायला तयार नाहीत, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पंढरपूरच्या शिष्टमंडळाने गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याच्या बॉण्ड्रीवरील कारखानदारांच्या गाठीभेटी घेणे सुरू आहे.
पंढरपूर तालुक्यात या कारखान्यांच्या 100 ते 150 टोळ्या आणण्याचे नियोजन सुरू आहे व येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3000 रु. दर मिळवून देण्यासाठी व अभद्र युती करुन दर पडणाऱ्या कारखानदारांना धडा शिकविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील व सर्व स्वाभिमानी टिम कार्यरत आहे. त्यामुळे या गाळप हंगामात पंढरपूर कार्यक्षेत्रातुन ऊस उचलणाऱ्या साखर कारखानदारांची तारांबळ होणार आहे.

प्रत्येक साखर कारखाना सरासरी सत्तर ते ऐंशी किलोमीटर ऊस आणत असतो. मग सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर कारखान्यांना पंचवीस ते तीस किलोमीटरची जादा वाहतूक करून पंढरपूर तालुक्यातील व परिसरातील ऊस गाळपासाठी नेता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळू शकतो आणि कारखान्यांनाही मुबलक ऊस पुरवठा होऊ शकतो. सदर कारखान्याच्या प्रशासनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब व पंढरपूरचे सर्व स्वाभिमानीचे टीम शेतकऱ्यासोबत या कारखान्याचा करार करून यांचे ऊस सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यातील व सोलापूरच्या बॉण्ड्रीवरील कारखान्यांना 2800 ते 3000 हजार रुपये याप्रमाणे देण्याचे नियोजन करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील व पंढरपूर परिसरातील साखर कारखानदार जाणीवपूर्वक उसाला दर देत नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा नवा पर्याय शोधला आहे. दुष्काळामध्ये सांगलीचे पाणी लातूरला जाते, पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याचा कांदा कोल्हापूरला जातो, मग आम्ही ऊस बाहेर देऊन तीन हजार रुपयेचा दर घेऊ व इथल्या साखर सम्राटांना धडा शिकवू, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटना, पंढरपूर यांनी घेतली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng