पंढरपूर येथील एमआयटी ज्युनिअर कॉलेजचा फिएस्टा २०२३ उत्साहात संपन्न

पंढरपूर (बारामती झटका)

एमआयटी विश्वशांती गुरुकुल ज्युनिअर कॉलेजचा फिएस्टा २०२३ शनिवार दि. २१ जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. पंढरपूर तालुक्यातील व आसपासच्या अनेक शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवून बक्षिसे व ट्रॉफी जिंकल्या. यामध्ये ॲग्रीकल्चर झोन, गेम झोन, सायन्स प्रोजेक्ट झोन, डान्स, वाद्य, गायन इत्यादीमध्ये विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदवला.

यामध्ये विजयी विद्यार्थी व त्यांच्या शाळा खालीलप्रमाणे

  • हेमंत भांगे (सोलो सॉंग – प्रथम क्रमांक, एमआयटी वाखरी)
  • सोहम तोरणे (सोलो सॉंग – द्वितीय क्रमांक, हनुमान विद्यालय, तोंडले)
  • कीर्ती नाईकनवरे (सोलो डान्स – प्रथम क्रमांक, हनुमान विद्यालय, तोंडले)
  • सहारा मोरे (सोलो डान्स – द्वितीय क्रमांक)
  • रेणुका विद्यालय, बाबुळगाव (ग्रुप डान्स – प्रथम क्रमांक)
  • लोटस पब्लिक स्कूल, पंढरपूर( ग्रुप डान्स – द्वितीय क्रमांक)
  • श्री मधुकर भांगे (पालक, गायन)

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमआयटी गुरुकुल चे सीनियर प्रिन्सिपल श्री. अपु डे व ज्युनिअर कॉलेजच्या प्रिन्सिपल सौ. कार्तिश्वरि मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाढा येथे होणाऱ्या नेत्र शस्त्रक्रिया शिबिरासाठी सुनेत्रा अजित पवार यांना आमंत्रण
Next articleसंचालक मंडळाच्या चुकीच्या निर्णयामुळे आदिनाथ कारखान्याचे नुकसान, बचाव समितीचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here