पंढरपूर (बारामती झटका)
पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंढरपूर तालुका यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील प्रसिद्ध शिवशाहीर राज्यस्तरीय पुरस्कार विजेते शिवशाहीर राजेंद्र कांबळे (खुडूसकर) यांचा भव्य शाहीर पोवाडा हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे मनसे नेते दिलीप (बापू) धोत्रे यांनी सांगितले.
सदर शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांच्या भव्य शाहीर पोवाडा या कार्यक्रमास सर्व शिवभक्तांनी उपस्थित रहावे, असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच सदर कार्यक्रम पत्रिकाही प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर जयवंत (भाऊ) भोसले जिल्हाध्यक्ष व्यापारी सेना, शशिकांत पाटील तालुकाध्यक्ष, संतोष कवडे शहराध्यक्ष यांची नावे असून पंढरपूर येथील शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरपूर याठिकाणी सोमवार दि. २१ मार्च २०२२ रोजी सायं. ६ वा. सदर शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांच्या शाहीर पोवाडा या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे संयोजकांनी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng