सर्व जाती धर्मात मिळून मिसळून, नेहमी हसतमुख असणारे युवा नेतृत्व एजाज पठाण यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव.

पठाणवस्ती ( बारामती झटका )
पठाणवस्ती ता. माळशिरस या ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच एजाज फैजखान पठाण यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी पेढा भरवुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर अनेक मान्यवरांनी फेसबूक, व्हाट्सअप, फोनद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत.
पठाणवस्ती येथील सर्वसामान्य कुटुंबातील फैजखान व नजीराबी यांना दोन अपत्य एजाज आणि रियाज आहेत. फैजखान पठाण हे जिल्हा परिषदमध्ये चालक या पदावर कार्यरत होते. ते सध्या सेवानिवृत्त झालेले आहेत. फैजखान आणि नजीराबी यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केलेले आहेत. त्यापैकी एजाज पठाण यांना 38 वर्ष आज दि. 10 ऑक्टोबर 2021 रोजी पूर्ण होत आहेत. 39 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या मिनाज ह्या धर्मपत्नी आहेत तर अलिझा कन्यारत्न आहे. एजाज यांनी आपल्या आईवडिलांचा आदर्श आणि बंधू रियाज यांच्या सहकार्याने पठाणवस्ती ग्रामपंचायतमध्ये पंधरा वर्षापासून सदस्य म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी ग्रामपंचायतचे उपसरपंच पद देखील भूषविलेले आहे. गावामध्ये अनेक विकास कामे सर्व लोकांना विश्वासात घेऊन केलेली आहेत.

सुसंस्कृत स्वभाव, आचार विचार चांगले असल्याने त्यांनी गेल्या पाच वर्षापासून स्वतःचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय देखील सुरू केलेला आहे. छोटी मोठी कामे घेऊन कन्स्ट्रक्शन सुरू आहे. तालुक्यामध्ये सर्व जाती धर्मातील मित्र परिवारांचे जाळे आहे. त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस असणारा एजाजभाई यांना बारामती झटका परिवार यांचेकडून वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. आपणांस उदंड आयुष्य, आरोग्य, धनसंपदा लाभो हेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेस साकडे. हितचिंतक श्रीनिवास कदम पाटील बारामती झटका परिवार यांचेकडून खास शुभेच्छा !!!
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng