नातेपुते (बारामती झटका)
सोलापुर जिल्ह्यात माहे जून ते ऑक्टोबर या कालावधीत पाऊस वेळेवर सुरु होऊन मोठा खंड, पाऊस उशिरा सुरु होणे, पाऊस लवकर संपणे व पाऊस उशिरापर्यत पडणे व अतिवृष्टी अशा प्रकारे पडत असतो. पाऊसाच्या लहरीपणामुळे वेळेवर पेरणी न होणे उत्पादनात घट, किड व रोगाचा प्रार्दुभाव, दुबार पेरणी नापेर क्षेत्र अशा बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागते. अशा आपत्कालीन परिस्थितीत पीकाचे नियोजन केंद्रीय ड्राय लॅन्ड संशोधन संस्था, हैद्राबाद महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी कृषि संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र यांचे संशोधन सल्ल्याने आपत्कालीन पीक नियोजन आरखडा तयार केला आहे, त्यांची अमंलबजावणी शेतकरी बांधवानी खालील पद्धतीने करण्याचे आवाहन मंडल कृषि अधिकारी नातेपुते कार्यालयाने केले आहे.
१ – पाऊस उशिरा सुरुवात झालेस – जून दुसरा आठवडा – ह्या आपत्कालीन परिस्थितीत खालील पीके पेरणीचे नियोजन करावे. सर्व खरिप पिके जुलै पहिला, दुसरा ते ऑगस्ट पहिला, दुसरा आठवडा – बाजरी, सोयाबीन, मका, भूईमुग, तूर, हुलगा जमिनीच्या प्रकारानुसार घ्यावीत. बाजरी + तूर, सुर्यफुल + तूर या पिकाची पेरणी दोन चाडे पाभरने करावी. सप्टेंबर पहीला आठवडा – रब्बी ज्वारीची पेरणी करावी या आत्कालीन पीक नियोजनात बाजरी + तुर व सुर्यफुल + तुर ही पीके महत्वाची आहेत. २ – नियमीत पावसाळा ४ आठवडे पेक्षा उशिरा ( दि. १६ ते २२ जुलै ) – वरीलप्रमाणे नियोजनासह पेरणीसाठी २० ते २५% अधिक बियाणे वापरावे. रा. खते किमान २५% कमी वापरावीत. हायब्रीड वाणाचा वापर न करता सुधारित सरळ वाणांचा वापर करावा. नापेर क्षेत्रावर मुग उडीद पेरणी करावी. ज्वारी खोडमाशी, खोड पोखळणारी अळी नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करावी. ३ – नियमित पावसाळा पाच आठवडे पेक्षा जास्त उशिर सुरु होणे (दि. २३ ते २९ जुलै ) – अशा परिस्थितीत वरील पिकाचे सरळ वाण वापरून बियाणे २५ ते ३0 % अधिक बियाणे वापरावे . ज्वारी + तूर ‘ सोयाबीन + तूर पीक पद्धती घ्यावी सोयाबीन बी पेरणी २५ जुलै पर्यतच करावी . ४- आपत्कालीन पर्यायी पीक नियोजन व शिफारस – पेरणी १२ ते ३० जूनपर्यंत बाजरी, तुर, सुर्यफुल, मका, सोयाबीन, भूईमुग यांची करावी. १५ दिवस उशिर झाल्यावर व सुर्यफुल, तूर, एरंडी, हुलगा, मटकी यांची पेरणी पाऊस ३० दिवस उशिरा झाल्यावर करावी. याबरोबर मुलस्थानी जलसंधारण संरक्षीत पाणी, कोळपणी, खुरपणी, बीजप्रक्रिया जिवाणू व जैविक खताचा वापर करावा व १० ते १५% रोपे कमी करावीत. अशाप्रकारे पावसाच्या आगमन कालावधी खंडनुसार आपत्कालीन पीक नियोजन व आराखडा अवलंब केल्यास हंगाम वाया न जाता क्षेत्र नापेर न राहता अपेक्षीत उत्पादन येऊन उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून उत्पन्न घेता येईल यात काय शंका नाही.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng