पत्नीच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त पतीचा नेत्रदान, देहदान व अवयवदानाचा महत्वपूर्ण निर्णय.

कालकथित शितल नागेश लोंढे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पत्रकार व पती नागेश लोंढे यांचा देहदान व नेत्रदानाचा महत्त्वपूर्ण संकल्प.

अकलूज ( बारामती झटका )

गिरझणी ता. माळशिरस येथील चेतनसम्राट चे संपादक नागेश लोंढे यांच्या पत्नी स्व. सौ. शितल नागेश लोंढे यांचे आज सोमवार दि. 4 ऑक्टोंबर 2021 रोजी प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये संपादक नागेश लोंढे यांनी स्वेच्छेने मरणोत्तर देहदान, नेत्रदान व अवयवदान करण्याचे संमती पत्र उपजिल्हा रुग्णालय, अकलूजचे कर्तव्यदक्ष डॉ. मुकुंद जामदार यांच्याकडे संमती पत्र दिलेले आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य त्रिभुवन उर्फ बाळासाहेब धाईंजे, आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे, एमजीएम चे राज्य सचिव वैभव गीते, पंचायत समिती सदस्य अजय सकट, माजी उपसरपंच प्रवीण खराडे, पंढरीभूषण चे संपादक शिवाजीराव शिंदे, ज्येष्ठ पत्रकार मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांतनाना कुंभार, माळशिरस तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष भारत मगर, आनंद कुमार लोंढे, आनंदराव जाधव, गीताचार्य संजय हुलगे, विलास साळुंखे, सागर खरात, आरोग्य सेवक झुरळे, दडस व अनेक मान्यवर उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर मुकुंद जामदार यांनी या उपक्रमाचे कौतुक करून प्रशासनाच्यावतीने निर्णयाबद्दल नागेश लोंढे यांना धन्यवाद दिले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरसमधील राष्ट्रीय महामार्ग 965 मधील सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा रस्ता रोको
Next articleबारामती येथे प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here