पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी अप्पासाहेब कर्चे यांची निवड

सोलापूर (बारामती झटका)

पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूर येथील शासकीय विश्रामग्रह येथे बैठक घेण्यात आली. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटक दत्तात्रय पवार होते. या बैठकीत प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा, ज्येष्ठ पत्रकार सन्मान पेन्शन योजना, पत्रकारांसाठी विमा योजना, घरकुल योजना, यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती, पत्रकारांवर होणारे हल्ले, धमकी, मारहाण, राज्यातील सर्व पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, राज्यातील युट्युब पोर्टलला शासकीय मान्यता, कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना शासकीय मदत यांसह पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा होऊन पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी आप्पासाहेब कर्चे यांची एकमताने निवड करण्यात आली. आप्पासाहेब कर्चे यांचा पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी शाल, पुष्पगुच्छ, नियुक्ती पत्रव ओळखपत्र देऊन सत्कार केला.

यावेळी नूतन पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करून पत्रकारांचे प्रश्न सोडवणार असल्याचे आवर्जून सांगितले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, सोलापूर जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार, जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा, सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे, शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी, (बी. एस. ) शहर उपाध्यक्ष श्रीनिवास वंगा, शहर प्रसिद्धीप्रमुख अक्षय बबलाद, पत्रकार सुरक्षा समितीचे मार्गदर्शक डॉ. राजेंद्र शहा, ऋषिकेश ढेरे, बाबा ननवरे, दादा भांड, राजेश बरगडे, बीपीन दिड्डी, केरबा माने, सिद्राम येलदी, विश्वनाथ खटावकर, सूर्यकांत व्हनकडे, सतीश गडकरी इत्यादी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकोथळे गाव रस्त्याच्या गैरसोईमुळे विकासापासून वंचित
Next articleपेरु, डाळींब, सिताफळ उत्पादनात फॉम बॅग व अॅन्टी फॉग बॅग वापरणे काळाची गरज – सतीश कचरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here