पनवेल येथील सभेत पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा..!

पनवेल (बारामती झटका)

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राने आयोजीत केलेल्या शासकीय विश्रामगृह पनवेल येथे पार पडलेल्या सभेत अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी पनवेल येथील वरिष्ठ पत्रकार व दैनिक वादळवारा चे संपादक विजय कडू यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे सर्वानुमते ठरले. समितीने मागवलेल्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा होऊन दैनिक संध्याकाळच्या संपादिका रोहिणी खाडिलकर पोतनीस व दैनिक प्राऊड चे संपादक उमेश गुजराती यांना जाहीर करण्यात आला.

इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पुरस्कार लक्ष्मीकांत घोणसे पाटील, शिक्षक पुरस्कार वंदना निशिकांत ढवळे व संजय जयराम होळकर यांना तसेच समाजसेवेचा पुरस्कार विवेक नारायण मोकल व सौ. शशिकला गणपत गुंजाळ तर वैद्यकीय सेवेचा पुरस्कार डॉ. मनोज नागरगोजे यांना घोषित करण्यात आला आहे. तसेच २५ ज्योती हा वेगळ्या कार्यक्षेत्रातील ५ भगिनींना दिला जाणारा पुरस्कार प्रेरणा गावकर, शिल्पा सीमा पाटील, सलोनी मोरे व प्रमिला पवार यांना जाहीर करण्यात आला आहे.

यावेळी समितीचे कार्याध्यक्ष अविनाश म्हात्रे, उपाध्यक्ष राकेश खराडे, उपाध्यक्ष राम जाधव, सचिव वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, सदस्य ज्ञानेश्वर कोळी, सहसचिव अमोल सांगळे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर पाटील, वरिष्ठ सदस्य गुरुनाथ तिरपणकर, पनवेल तालुका अध्यक्ष अशोक घरत, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कांबळे यांच्यासह अनेक सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमुंबई येथे नामदेव महिला परिषदेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
Next articleसिंधुरत्न फाऊंडेशन प्रस्तुत “विधीलेख” या महिला दशावतार नाटकातील कलावंतांची सदिच्छा भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here