परमपूज्य भाईनाथ महाराज परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराच्या शुभारंभाची लगबग सुरू.

वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन करणार – दादाराजे घाडगे

वेळापूर ( बारामती झटका )

वेळापूर ता. माळशिरस येथील वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सुरू झालेली आहे. परमपूज्य भाईनाथ महाराज परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची लगबग विभागीय संपर्क कार्यालयात सुरू आहे. वेळापूरचे ग्रामदैवत श्री अर्धनारीनटेश्वर मंदिर व गावातील सर्व मंदिरांना श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्याची लगबग सकाळपासून सुरू आहे.

वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तापरिवर्तन करणार असल्याचा निर्धार अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यशवंतराव उर्फ दादाराजे घाडगे यांनी बोलून दाखवला. निवडणुकीत सभासद मतदार यांचा उमेदवारी अर्ज भरल्यापासून पाठिंबा आहे. काल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख होती. परिवर्तन विकास आघाडीला शिट्टी हे चिन्ह मिळालेले आहे. पॅनलचे सर्व मार्गदर्शक व नेतेमंडळी यांच्यासह सर्व उमेदवार मिळून गावातील ग्रामदैवतांना श्रीफळ वाढविणार आहेत.

सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटामध्ये घाडगे मोहनराव गोविंदराव, घोरपडे भरत श्रीरंग, मंडले नारायण शंकर, माने देशमुख दिपक पांडुरंग, माने देशमुख मदनसिंह वसंतराव, पोळ आनंत नारायण, सावंत शिवाजी महादेव, महिला प्रतिनिधी गटात, आडत सुलोचना तुकाराम, पन्नाशी सिंधुबाई हणमंत, अनुसूचित जाती जमाती गटात बनसोडे रघुनाथ गणपत, भटक्या जमाती विभक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटात चोरमले दादा बाबा, इतर मागास प्रवर्ग आडत शंकर नामदेव असे १२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.

परमपूज्य भाईनाथ महाराज परिवर्तन विकास पॅनलचे मार्गदर्शक वेळापूरचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय शंकरराव माने देशमुख उर्फ हरीसाहेब यांचे चिरंजीव अशोकराव शंकरराव माने देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याचे यशवंतराव उर्फ दादाराजे घाडगे यांनी सांगितले. यावेळी युवा नेते संदीप तात्या माने देशमुख, वेळापूर ग्रामपंचायतीचे सदस्य संजय मंडले, उद्योजक सुखदेव आडत (अंबानी) यांच्यासह उमेदवार व सभासद उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसनदी अधिकारी भाजपच्या धास्तीत…
Next articleमाजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सोलापूर आणि नगर जिल्ह्याची निवडणूक प्रभारी जबाबदारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here