परांडा येथील आरोग्य शिबिरात मोफत औषधोपचार आणि शस्त्रक्रियेचे आयोजन

प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातून 5000 रुग्णांना नेण्याची व्यवस्था

रुग्णांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

करमाळा (बारामती झटका)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा येथील राज्यस्तरीय आरोग्य शिबिर 27 नोव्हेंबर रोजी होत असून या आरोग्य शिबिरात 500 तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांची तपासणी केली जाणार असून रुग्णांना औषधोपचार, शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिराला जाण्यासाठी करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावातून वाहनाची व्यवस्था करण्यात येणार असून आरोग्य शिबिराचा फायदा घ्यायचा आहे. त्यांनी आपली नाव नोंदणी करमाळा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात करावी, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे

परंडा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आरोग्य शिबिराचे नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी बंगार्डे मॅडम सह आरोग्य खात्याचे प्रमुख अधिकारी तालुकाप्रमुख देवानंद बागल, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, उपतालुका प्रमुख दादा थोरात, प्रशांत नेटके, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. कारंडे, जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, शिवसेना शहरप्रमुख संजय शीलवंत, उपशहर प्रमुख राजेंद्र काळे, नागेश गुरव, पिंटू गायकवाड, शिवसेना वैद्यकीय तालुका समन्वयक दीपक पाटणे, करमाळा कक्ष प्रमुख रोहित वायबसे, कोळगाव शाखाप्रमुख नागेश शेंडगे, हिवरवाडी अजिनाथ इरकर, रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण, मोहल्ला अध्यक्ष अनिस कबीर, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, शाखाप्रमुख सुरज कांबळे, मनोज चिवटे, शिवसेना प्रवक्ते ॲड. शिरीष लोणकर, महिला आघाडीच्या नेत्या पुष्पाताई शिंदे,
निवृत्त कर्मचारी, संघटना अध्यक्ष प्रदीप शिंदे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

परंडा येथे होणाऱ्या आरोग्य शरीरात प्रत्येक रुग्णाची सर्व प्रकारची तपासणी होणार आहे. या ठिकाणी आलेल्या रुग्णांची जेवणाची, नाश्त्याची सोय कारण्यात आली आहे. तपासणी झाल्यानंतर रुग्णांना मोफत चष्मे वाटप, अपंगांना अपंगांचे साहित्य, कर्ण दोष असणाऱ्यांना मशीन देण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिरात एखाद्या रुग्णावर महागडी शस्त्रक्रिया करण्याची गरज असेल तर त्या रुग्णावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करून दिल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र शासनाचा आरोग्य शिबिराचा फायदा प्रत्येक रुग्णाला व्हावा म्हणून रुग्णांना परंडा येथे येण्या-जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या महाआरोग्य शिबिरात जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या रुग्णांनी करमाळा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधावा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउंबरे दहिगाव ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…
Next articleनातेपुते येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे व भव्य दिव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here