पळसमंडळ शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भरत अप्पाजी करे यांची बिनविरोध नियुक्ती.

पळसमंडळ ( बारामती झटका )

पळसमंडळ तालुका माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गावचे पोलीस पाटील पोपट राऊत यांच्या उपस्थितीत युवा नेते भरत आप्पाजी करे यांची सर्वानुमते बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी समितीतील अन्य निवडीही जाहीर करण्यात आल्या उपाध्यक्ष सुरेखा धनपाल भोसले, सदस्य वैभव करे, अनिता करे, जयश्री कुंभार, ज्योती खोमणे, दिपाली खिलारे, नामदेव टकले सलमा मुलानी उशा साळवे रूपाली मेटकरी किरण चव्हाण ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अमोल जाधव, शिक्षक प्रेमी नागरिक बाळासाहेब काळे, शिक्षक प्रतिनिधी पोटफोडे सर, सचिव काळे सर, अशा निवडी बिनविरोध उत्साही व शांततेच्या वातावरणात पार पडलेल्या आहेत.


पळसमंडळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली ते सातवी येथे पर्यंत आहेत सदरच्या शाळेत 230 विद्यार्थी व विद्यार्थिनी आहेत एक मुख्याध्यापक महादेव काळे व अन्य सात शिक्षक आहेत. जिल्हा परिषद शाळेचे काम चांगल्या पद्धतीने आहे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आहेत गावामध्ये शालेय व्यवस्थापन समिती आदर्श असावी यासाठी गावचे अभ्यासू नेतृत्व पोलीस पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले आपण शाळेचे प्रत्येकाने आपली भूमिका व्यवस्थित बसवावी शिक्षणाचा दर्जा उंचावेल याकडे लक्ष द्यावे असे सांगितले
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भरत आप्पाजी करे यांची बिनविरोध निवड होताच शिवामृत दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन भानुदास गोविंदराव भोसले पाटील, माजी सरपंच भगवान दिनकर करे, शिवामृत चे विद्यमान संचालक विठ्ठल जंगलु जाधव, उपसरपंच रणजीत बापूराव करे, पांडुरंग बाबू करे, संभाजी विठ्ठल करे यांनी अभिनंदन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article………अन्यथा गुरसाळे ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करणार.
Next articleअकलूज येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांची 424 वी जयंती साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here