पवनकुमार जाधव याने रेखाटलेल्या लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे स्केचचे अनेकांचे लक्ष वेधून घेतले..

मांडवे (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा वाढदिवस मांडवे ५० फाटा येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी मळोली गावचे प्रगतशील बागायतदार व माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजीराव मारुती जाधव यांचे नातू श्री. बापूराव जाधव यांचे चिरंजीव पवनकुमार यांनी लोकप्रिय आमदार राम सातपुते यांचे स्केच काढून सदर चित्राची फ्रेम वाढदिवसाची भेट म्हणून देण्यात आली. यावेळी मळोली गावचे माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, माजी पोलीस पाटील व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग उर्फ आप्पासो जाधव पाटील, शिवशंकर सोसायटीचे माजी चेअरमन अरुण पवार, धनगर उन्नती समाज मंडळाचे अध्यक्ष माळेवाडी, अकलूजचे युवा नेते उल्हास वाघमोडे पाटील, साळमुखवाडी दूध संस्थेचे चेअरमन अंकुशराव देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्याकरता भव्य स्टेज मंडप शामियाना उभारलेला होता‌. जनतेची प्रचंड गर्दी होती. समोर स्क्रीन सुरू होती. त्यामुळे सर्वांना बसून स्टेजवरील हालचाली पाहता येत होत्या. चिरंजीव पवनकुमार याने रेखाटलेले आमदार यांचे स्केच पाहिल्यानंतर लहान मुलाचे कौतुक केले व उपस्थितांचे लक्ष या स्केचने वेधून घेतलेले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनाद करायचा नाय… आमदार केसरी बैलगाडी शर्यतीचा, बैलगाडी स्पर्धेला येताना वाहनात, बैलगाडीत जाताना बक्षिसाच्या मोटरसायकलीवरच….
Next articleआंबे येथे ह.भ.प. डॉ. किरण महाराज बोधले यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here