पवार कुटुंबीय गोविंदबाग ऐवजी आप्पासाहेब पवार सभागृहात पाडवा स्नेह मेळावा संपन्न होणार.

एक वर्षानंतर पाडवा स्नेहमेळावा कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतरासाठी ठिकाण बदलले.

बारामती ( बारामती झटका )

दीपावली पाडवा आणि गोविंद बाग असे नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे समीकरण बनलेले होते. दरवर्षी पवार कुटुंबीय लोकांसमवेत पाडवा स्नेह मेळावा गोविंद बाग येथे साजरा करीत असतात मात्र, गेल्यावर्षी कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलेले असल्याने गोविंद बाग येथील पाडवा स्नेह मेळावा रद्द केलेला होता. यंदाच्या वर्षी माजी केंद्रीय कृषिमंत्री देशाचे नेते पवार कुटुंबियांचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पाडवा स्नेह मेळावा करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे पाडवा स्नेह मेळावा पवार कुटुंबीय जनतेसमवेत साजरा करणार आहेत मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोविंद बागेच्या ऐवजी शारदा नगर एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या डॉक्टर आप्पासाहेब पवार सभागृहात होणार आहे. गोविंद बागेतील जागेची अडचण होऊ नये यासाठी पहिल्यांदाच स्नेह मेळावा आप्पासाहेब सभागृहात होणार आहे.पवार कुटुंबीयात दिपवाळी सणानिमित्त देश-विदेशात असणारे सर्व सदस्य एकत्र दिवाळी साजरी करण्याची प्रथा आहे. कार्यकर्त्यांना स्नेह मेळावा शुभेच्छा देणे घेण्याचा कार्यक्रम दीपावली पाडवा या दिवशी असतो.

पवार कुटुंबीय यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो लोक येत असतात. गेल्यावर्षी कोरोना संसर्ग रोगाने स्नेहमेळावा रद्द झालेला होता. यंदाच्या वर्षी पुन्हा सुरू झालेला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, आमदार रोहितदादा पवार उद्या शुक्रवार सकाळी सात ते अकरा या वेळेत दिवाळी पाडव्यानिमित्त दिवाळी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी नागरिकांची भेट डॉक्टर आप्पासाहेब पवार सभागृह माळेगाव (शारदानगर) बारामती येथे होणार आहे.कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नसल्याने भेटीसाठी येताना प्रत्येकाने व्यवस्थित मास्क वापरावा, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे, गर्दी करू नये, पुष्पगुच्छ किंवा भेट वस्तू आणू नये, सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleयुवा आमदार रोहितदादा पवार यांच्या शुभहस्ते शौर्य डेंटल क्लिनिकचे थाटात उद्घाटन समारंभ संपन्न.
Next articleसदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रत्यक्ष गाळपास सुरुवात झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here