पांडुरंग सहकारी साखर कारखाना स्थळावर जपान येथील झोमलींग ऊस तोडणी यंत्राचे प्रात्यक्षिक व उद्घाटन समारंभ

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या शुभहस्ते श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांतराव परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली व विविध चेअरमन यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार – भानुदास सालगुडे पाटील.

माळशिरस ( बारामती झटका )

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर ता. माळशिरस या कारखाना स्थळावर जपान मधील झोमलीन कंपनीचे ऊस तोडणीचे मशीन भारतामध्ये पहिल्यांदाच प्रात्यक्षिक व उद्घाटन समारंभ बुधवार दि. 06/04/2022 रोजी सकाळी 10 वाजता शेखर गायकवाड साखर आयुक्त पुणे यांच्या शुभहस्ते तर आमदार प्रशांतराव परिचारक चेअरमन श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपुर कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहेत.

सदर कार्यक्रमास विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार बबनराव शिंदे, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार समाधान आवताडे, साखर विकास संचालक पांडुरंग शेळके साहेब, भैरवनाथ शुगर वर्क्स चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत, दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर रंजनभाऊ गिरमे, साखर सहसंचालक सोलापूर साठे साहेब, चंद्रभागा सहकारी साखर कारखाना भाळवणी चेअरमन कल्याणराव काळे, जकराया शुगर मिल मंगळवेढा ॲड. बी. बी. जाधव, धाराशिव शुगर चेअरमन अभिजीत पाटील, बबनराव शुगर इंडस्ट्रीज चेअरमन रणजितसिंह शिंदे, युटोपियन शुगर चेअरमन उमेश परिचारक, ओंकार शुगर चांदापुरी चेअरमन बोत्रे साहेब, नॅचरल शुगर उस्मानाबाद चेअरमन बी. बी. ठोंबरे, श्री श्री सद्गुरु साखर कारखाना राजेवाडी चेअरमन एन. शेषागिरी राव, सिद्धेश्वर साखर कारखाना चेअरमन धर्मराज काडादी, जयहिंद शुगर चेअरमन माने देशमुख, लोकनेते शुगर मोहोळ चेअरमन अजिंक्यराणा पाटील, सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲड. प्रकाशराव पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर व्हाईस चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन खुळे साहेब, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव कुलकर्णी, पुणे साखर संचालक डॉ. भोसले, ॲग्री बिजनेसचे जनरल मॅनेजर एस. अरुण जोती, सेल्स आणि मार्केटिंग चे मॅनेजर के. एस. इनामदार आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.

तरी सदरच्या कार्यक्रमास सर्व शेतकरी, ऊस उत्पादक सभासद, नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन दामिनी ॲग्री टेक सदाशिवनगर व एमआयडिसी बारामतीचे एक्झिक्युटिव डायरेक्टर भानुदास सालगुडे पाटील यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत 13 जागांसाठी 61 उमेदवारी अर्ज दाखल.
Next articleधैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते दोन भीम गीतांचे प्रसारण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here