पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व दमदार आमदार राम सातपुते यांच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांची धुळवड आनंदात….

मार्च महिन्यातसुद्धा माळशिरस तालुक्यातील ओढे पाण्याने वाहत असल्याने बळीराजा समाधानाने सुखावला…

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते या दोन लोकप्रतिनिधींच्या योग्य नियोजनामुळे मार्च महिन्यातसुद्धा माळशिरस तालुक्यातील ओढे पाण्याने वाहत आहेत. अकलूज-सांगोला रोडवरील वेळापूर-मळोली दरम्यान असणारा घुमेरा ओढा पाण्याने खळखळ वाहत असल्याने बळीराजा समाधानाने सुखावला आहे. होळी पौर्णिमेनंतर असणारा धुलीवंदन सण त्याला ग्रामीण भाषेत धुळवड बोलले जाते, ही धुळवड शेतकरी आनंदात साजरी करत आहेत.

बळीराजाला सर्वात जास्त शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते. माळशिरस तालुक्यात उजनी कॅनल व निरा उजवा कॅनल यांच्या माध्यमातून शेतीला पाणी मिळत असते. ऐन उन्हाळ्यामध्ये हातात-तोंडाला आलेली पिके पाण्याअभावी जळून जात असतात. यंदाच्या वर्षी पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व दमदार आमदार राम सातपुते या दोन लोकप्रतिनिधींनी योग्य नियोजन करून जलसंपदा विभागाकडून ओढे नाले बंधारे तलाव भरण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे ऊस पीक तुटून गेलेले आहे. काहींचा खोडवा आहे तर अनेक लोकांनी नवीन लागण केलेली आहे. याचबरोबर गहू, हरभरा, भुईमूग, मका व फळबागा अशी पिके शेतामध्ये आहेत. पाण्याची खरी गरज एप्रिल, मे या दोन महिन्यात असते. हीच गरज ओळखून लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विचाराचे सरकार असल्याने मतदार संघातील पाण्याच्या प्रश्नावर भर दिलेला आहे. तरीसुद्धा काही लोकांकडून पाणी पेटवले जात आहे.

खऱ्या अर्थाने माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये निरा-देवधरचा अनेक दिवसापासून रखडलेला प्रश्न दमदार आमदार राम सातपुते यांनी विधानभवनात प्रश्न मांडून राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. व कार्यतत्पर पाणीदार खासदार यांनी राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्नांची खास आढावा बैठकीचे आयोजन करून अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्यामध्ये माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा व रखडलेला निरा-देवधर प्रकल्पातील कॅनलचा प्रश्न मार्गी लावलेला असल्याने माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांमध्येसुद्धा समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

लवकरच माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात सुद्धा घुमेरा ओढा या ठिकाणी मार्चमध्ये सुद्धा वाहत आहे. तशाच पद्धतीने माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात सुद्धा थोड्याच दिवसात मार्च, एप्रिलमध्ये सुद्धा ओढे वाहतील, असा विश्वास तालुक्यातील शेतकऱ्यांना असल्याने पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व दमदार आमदार राम सातपुते या दोन लोकप्रतिनिधींच्या योग्य नियोजनामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची धुळवड आनंदात सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआरोग्य कुटुंब कल्याणमंत्री तानाजीराव सावंत यांनी स्व. संजय सावंत यांच्या कुटुंबियांना केली मदत
Next articleप्रा. फातिमा मुल्ला-इनामदार यांना कॉम्प्यूटर इंजिनियरिंग विषयात पीएच.डी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here