काँग्रेसचे प्रकाशबापू पाटील व उद्योजक डॉक्टर सुनील काका पाटील यांना मातृशोक.
माळशिरस ( बारामती झटका )
पानिव ता. माळशिरस येथील श्रीमती सुमन शामराव पाटील यांचे मंगळवार दि. 04/01/2022 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्यावर पानीव येथील श्रीराम शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये रात्री दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाशबापू पाटील व उद्योजक डॉक्टर सुनीलकाका पाटील यांच्या मातोश्री होत्या.
माळशिरसचे माजी आमदार स्वर्गीय शामराव पाटील यांच्या धर्मपत्नी होत्या. सुमनभाभीने शामराव भाऊंच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुखदुःखात नेहमी साथ दिलेली होती. भाभींचा सुसंस्कृत स्वभाव, बोलण्यामध्ये आपलेपणा, वागण्यात नम्रता, धार्मिक वृत्ती यामुळे भाभी सर्वांना परिचित होत्या. काही महिन्यापूर्वी माजी आमदार शामरावभाऊ पाटील यांचे दुःखद निधन झालेले होते. वडिलांच्या दुःखातून सावरत असताना प्रकाशबापू आणि सुनीलकाका यांना मातोश्रीच्या निधनाने दुःख झालेले आहे. रात्री उशिरा पार्थिव देहावर मुखाग्नि देत असताना अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ व पानीव पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. सुमनभाभीच्या रक्षाविसर्जन (तिसऱ्याचा) कार्यक्रम गुरुवार दि. 06/10/2022 रोजी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी पानीव ता. माळशिरस येथे होणार आहे. सुमनभाभीच्या मृतात्म्यास शांती लाभो व पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका परिवार आणि श्रीनिवास कदम पाटील परिवार, मळोली यांचेवतीने भावपूर्ण आदरांजली.