माळशिरस पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. श्रीलेखा पाटील यांच्या पुरस्कारानिमित्त वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काकासाहेब मोटे यांचेकडून सन्मान.
माळशिरस ( बारामती झटका )
पानीव ग्रामपंचायतच्या कर्तव्यदक्ष सरपंच व माळशिरस पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. श्रीलेखा प्रकाश पाटील उर्फ वहिनी यांचा पानीव ग्रामपंचायतीस महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे नेते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काकासाहेब मोटे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीराम शिक्षण संस्थेचे खजिनदार दिनेशआप्पा शिंदे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष किशोर तुपसौंदर, युवा नेते सौरभ शेगर आदी उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यामध्ये पानीव ग्रामपंचायतीवर महिलाराज असल्याची माळशिरस तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पानीव ग्रामपंचायतची नोंद आहे. अशा महिलाराज असणाऱ्या ग्रामपंचायतीने सरपंच श्रीलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे करून पानीव गावचा चेहरामोहरा बदललेला आहे. गावामध्ये अनेक शासनाच्या योजना यशस्वीपणे राबविलेल्या आहेत. पानीव ग्रामपंचायतीस महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल कर्तव्यदक्ष सरपंच श्रीलेखा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काकासाहेब मोटे यांनी पानीव येथील निवासस्थानी जाऊन सन्मान केलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng